बाटलीवर समोर लिहिलंय 100 टक्के शुद्ध 'नारळ तेल', पण मागे लिहिलं सत्य वाचाल तर थक्क व्हाल, महिलेचा धक्कादायक खुलासा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नारळाच्या तेलाच्या शुद्धतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
मुंबई : भारतीय घरांमध्ये वापरले जाणारे तेल म्हटलं की, सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे नारळाचं तेल (Coconut Oil). याचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच नाही, तर त्वचा आणि केसांच्या निगेसाठीही केला जातो. अनेक महिलांसाठी नारळाचं तेल हा रोजच्या दिनचर्येचा भाग आहे. मात्र अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नारळाच्या तेलाच्या शुद्धतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
लेबलवर ‘100% शुद्ध नारळ तेल’ लिहिलेलं असलं तरी, त्यामागचं सत्य वेगळंच असल्याचं उघड झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (म्हणजेच पूर्वीचा ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. यात एक महिला किराणा दुकानात नारळ तेलाची बाटली दाखवताना दिसते. बाटलीच्या पुढील बाजूवर मोठ्या अक्षरात “100% Pure Coconut Oil” असं लिहिलेलं असतं. पण ती बाटली मागून दाखवते, तेव्हा घटकांच्या यादीत वेगळीच गोष्ट दिसते त्यात नारळाच्या तेलासोबत ‘वनस्पती तेल’ (Vegetable Oil) देखील असल्याचं नमूद आहे. त्यामुळे ती महिला व्हिडीओमध्ये विचारते, “हे 100% शुद्ध नारळ तेल कसं असू शकतं?”
advertisement
या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी हे ब्रँड्सची फसवणूक असल्याचं म्हटलं, तर काहींनी “कदाचित ती लेबल चुकीने वाचत आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला. पण या चर्चेत एक प्रामाणिक नारळ तेल उत्पादकाने दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली.
या उद्योगपतीने सांगितलं की, “माझ्या कुटुंबाचा नारळ तेल उत्पादन व्यवसाय गेल्या 110 वर्षांपासून चालत आहे. आम्ही नेहमी गुणवत्तेवर भर देतो. पण आजच्या बाजारात अशा तेलांच्या किमती आमच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत. त्यामुळे लहान उत्पादकांना स्पर्धा करणे जवळपास अशक्य आहे.”
advertisement
त्यांनी आकडेवारीसह हे स्पष्ट केलं की नारळ तेल तयार करण्यासाठी वापरला जाणारा ‘खोबरा’ सध्या सुमारे ₹240 प्रति किलो दराने मिळतो. 1000 किलो खोबर्यातून सुमारे 650 लिटर शुद्ध नारळ तेल मिळतं, म्हणजे प्रति लिटर उत्पादन खर्च साधारण ₹370 होतो. यावर वाहतूक आणि पॅकेजिंगचा खर्च धरला, तर एकूण किंमत ₹390 ते ₹400 पर्यंत जाते. “जर एखादा ब्रँड यापेक्षा कमी दरात नारळ तेल विकत असेल, तर समजा की त्यात काहीतरी गडबड आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
Parachute 100% pure coconut oil ...
but..........
Is she reading the labels wrong? or there is some technical truth in what the brand claims? pic.twitter.com/vgmVP5TK5J
— Woke Eminent (@WokePandemic) November 10, 2025
त्यांच्या या खुलाशावर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सहमती दर्शवली. एका वापरकर्त्याने लिहिलं, “मी नारळ तेल उत्पादनाशी संबंधित नाही, पण प्रत्येक छोट्या उत्पादकाची ही वेदना समजू शकतो.”
advertisement
यामुळे आता ग्राहकांपुढे मोठं आव्हान आहे आपल्या घरात वापरलं जाणारं “100% शुद्ध नारळ तेल” खरंच इतकं शुद्ध आहे का? की फक्त लेबलवरच ते शुद्ध आहे?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बाटलीवर समोर लिहिलंय 100 टक्के शुद्ध 'नारळ तेल', पण मागे लिहिलं सत्य वाचाल तर थक्क व्हाल, महिलेचा धक्कादायक खुलासा


