Eco Friendly: आता बाप्पा दिसेल अधिकच आकर्षक, फक्त 700 रुपयांत नाशिकमध्ये इथं मिळेल डेकोरेशन

Last Updated:

Eco Friendly: या वर्षी 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये गणपतीच्या सजावटीबाबत चर्चा सुरू आहेत.

+
Eco

Eco Friendly: आता बाप्पा दिसेल अधिकच आकर्षक, फक्त 700 रुपयांत इथं मिळेल डेकोरेशन

नाशिक: हिंदू धर्मामध्ये गणपतीला आद्यदेवता मानलं आहे. श्रीगणेशाची नियमित पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यातील सर्व दु:ख आणि संकटं दूर होतात, असं म्हटलं जातं. श्रीगणेशाला बुद्धीचा दाता म्हणूनही ओळखलं जातं. अशा या विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी भाद्रपद महिन्यात त्याची 10 दिवस आराधना केली जाते. त्यालाच आपण 'गणेशोत्सव' म्हणतो. या वर्षी 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये गणपतीच्या सजावटीबाबत चर्चा सुरू आहेत. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी नाशिकमधील 'देविका आर्ट्स' यांनी इकोफ्रेंडली गणेश मखर बनवले आहेत.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि प्लॅस्टिकच्या सजावटीच्या सामनामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे आजकाल इकोफ्रेंडली वस्तूंच्या वापरावर भर दिला जात आहे. देविका आर्ट्सच्या संचालिका कोमल बोरसे यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेऊन अतिशय स्वस्त दरात आकर्षक असे बाप्पाचे डेकोरेशन बनवले आहेत. देविका गेल्या आठ वर्षापासून आपल्या घरात सजावटीच्या वस्तू बनवतात आणि त्यांची विक्री करत असतात. इकोफ्रेंडली कागद आणि पुठ्ठ्यांपासून तयार केलेलं हे डेकोरेशन फक्त 700 रुपयांपासून मिळत आहे.
advertisement
डेकोरेशन तयार करताना रंगीबेरंगी कागदी फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे हे डेकोरेशन अतिशय आकर्षक दिसत आहे. याशिवाय देविका यांनी विविध देखावे देखील साकारले आहेत. विठ्ठल-रुक्मिणी आणि गडकिल्ल्यांचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तुम्हाला देखिल देविका यांच्याकडील देखावे आपल्या घरी आणण्याची इच्छा असेल तर 'गुरुसंपदा सोसायटी, घर नंबर 3, महात्मानगर' या पत्त्यावर संपर्क साधता येईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eco Friendly: आता बाप्पा दिसेल अधिकच आकर्षक, फक्त 700 रुपयांत नाशिकमध्ये इथं मिळेल डेकोरेशन
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement