Shocking! महिलेचं 'हृदय फुटलं', फुलांचा सुगंध घेतल्यानंतर भयंकर घडलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman Flower Allergy : एक महिला जिला लिली फुलांचा गुच्छ दिसला आणि तिची पावलं त्या फुलांकडे वळली. ती फुलांच्या दिशेने चालत गेली. त्याच्या सुगंधाने ती...
नवी दिल्ली : फुलं दिसली की अनेकांना त्यांचा सुगंध घेण्याचा मोह आवरत नाही. अशीच एक महिला जिने फुलांचा सुगंध घेतला आणि तिच्यासोबतच भयंकर घडलं. ती जवळपास मृत्यूच्या दारातच पोहोचली. पण सुदैवाने कसाबसा तिचा जीव वाचला आहे. तिच्यासोबत नेमकं काय घडलं ते पाहुयात.
कॅनडातील नर्स ज्युलिया इव्हान्स. जिने अलिकडेच जेफ माराच्या पॉडकास्टवर तिची धक्कादायक कहाणी शेअर केली. या घटनेने ज्युलियाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
खरंतर, ज्युलियाला लिलीच्या फुलांच्या वासाची तीव्र ऍलर्जी होऊ लागली. यामुळे लवकरच हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकार थांबल्यामुळे तिचे निधन झाले आणि तिला "आयुष्यानंतरचे" अनुभव येऊ लागले. ज्युलियाने अलीकडेच जेफ माराच्या पॉडकास्टवर ही धक्कादायक कहाणी शेअर केली.
advertisement
ज्युलिया म्हणाली, त्या दिवशी तिचा कामाचा दिवस सामान्य होता, पण ती रुग्णालयात येताच तिला घसा खवखवल्यासारखं वाटलं. नर्सिंग स्टेशनवर तिला लिली फुलांचा गुच्छ दिला. फुलं पाहून तिला जाणवलं की तिला त्यांची ऍलर्जी आहे. पण ती सौम्य असेल असं तिला वाटलं आणि तिची पावलं त्या फुलांकडे वळली. ती फुलांच्या दिशेने चालत गेली. ज्यामुळे तिला तीव्र अॅनाफिलेक्टिक शॉक लागला.
advertisement
यानंतर तिला वाचवण्याची धडपड सुरू झाली. एकाने औषध घेतलं, दुसऱ्याने तिच्या नवऱ्याला बोलावले आणि एक सहकारी तिच्यासोबत बसली. ज्युलियाचा श्वास तीव्र झाला होता. एका डॉक्टरने लगेच एपिनेफ्रिन इंजेक्शन दिल, पण इथं झालेल्या चुकीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. सीरिंजमध्ये डोसच्या 10 पट डोस जास्त होता. तिचं हृदय जलद गतीने धडधडत होतं, तिला वाटलं की तिचं हृदय फुटलं.
advertisement
डॉक्टर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, ज्युलिया एका अंधाऱ्या ठिकाणी पोहोचली. जिथं तिला तिच्या आईचा आवाज ऐकू आला. जिचा 1983 मध्ये ब्रेन एन्युरिझममुळे मृत्यू झाला होता. तिची आई तिला सगळं ठिक आहे डिअर, आई आली आहे, असं म्हणतात तिनं ऐकलं. तिला एकाच वेळी तिच्या जिवलग मैत्रिणीची आत्महत्या, तिच्या सावत्र आईचं बुडणं आणि तिच्या आईच्या एन्युरिझमचं दुःख जाणवलं, त्यांच्या मृत्यूंना पुन्हा जिवंत केलं.
advertisement
अचानक ती प्रकाश आणि तेजस्वी रंगांच्या एका गडद क्षेत्रात प्रवेश गेली, जिथं फक्त प्रेम आणि सर्व गमावलेले लोक होते. मग एका धक्क्याने ती तिच्या शरीरात परतली. संपूर्ण प्रक्रियेसाठी तिला एक वर्ष लागलं.
या अनुभवाने ज्युलियाला हादरवून टाकलं. 2018 मधील ही घटना आहे. ज्युलियाने तिची कहाणी सांगण्यासाठी 'द लिली नर्स' हे पुस्तक लिहिलं आहे
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 09, 2025 1:17 PM IST


