Healthy Living: ‘थायरॉईड’ नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातून काढून टाका 5 पदार्थ

Last Updated:

Thyroid Disease: डायटिशियन डॉ. सारिका श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात, थायरॉईडवर मात करण्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे.

थायरॉईड 2 प्रकारचा असतो.
थायरॉईड 2 प्रकारचा असतो.
रामकुमार नायक, प्रतिनिधी
रायपूर : धावपळीच्या आयुष्यात आपल्या लाइफस्टाइलमध्ये अनेक बदल झाले आहेत. अवेळी जेवण आणि अपूर्ण झोप यामुळे आता वेगवेगळे आजार वेळेआधीच शरिराला जडतात. साठीतले अनेक आजार आता विशीतच पाहायला मिळतात. थायरॉईडही त्यापैकीच एक. या त्रासात आहारावर विशेष लक्ष देणं आवश्यक असतं.
डायटिशियन डॉ. सारिका श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात, थायरॉईडवर मात करण्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही पदार्थ अजिबात खाऊ नये, तर काही पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा. थायरॉईड 2 प्रकारचा असतो, हायपरथायरॉयडिज्म आणि हायपोथायरॉयडिज्म.
advertisement
जर आपण हायपोथायरॉयडिज्ममधून जात असाल तर कोबी, फ्लॉव्हर, सोयाबीन, शेंगदाणे, मोहरी, इत्यादी पदार्थांचा आहार अजिबात समावेश न करण्याचा सल्ला दिला जातो. तर, आपल्याला हायपरथायरॉयडिज्मचा त्रास असल्यास कोबी, फ्लॉव्हर, सोयाबीन, शेंगदाणे, मोहरी आवर्जून खावं असं सांगितलं जातं.
हायपोथायरॉयडिज्मच्या रुग्णांनी व्हाइट राइसच्या जागी ब्राऊन राइस खाणं उत्तम. तृणधान्य खावं, तसंच हळदीचं दूध पिऊ शकता, दुधी खाऊ शकता. कोथिंबीर आणि धणे खाणंही उत्तम. मात्र ते रात्रभर भिजवून सकाळी खावे. महत्त्वाचं म्हणजे फास्टफूड, जंक फूड, चायनीज आणि ग्लुटेनचे पदार्थ खाऊ नये.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Healthy Living: ‘थायरॉईड’ नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातून काढून टाका 5 पदार्थ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement