जेवल्यानंतर बडीशेप खाता? कधीतरी जेवणाआधी खाऊन बघा, जास्त फायदेशीर!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होतं. परंतु जर जेवणाच्या आधी बडीशेप खाल्ली तर जास्त फायदेशीर ठरतं, कसं पाहूया.
अनंत कुमार, प्रतिनिधी
गुमला : आजकाल बाजारात अनेक मुखवास मिळतात पण बडीशेप ती बडीशेप. ती एकदा खाल्ली की जेवण परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला माहितीये का, खरंतर बडीशेप जेवल्यानंतर खाण्यापेक्षा जेवणाआधी खाण्याचे अनेक फायदे आहेत. याबाबत स्वतः डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
आयुर्वेदिक डॉक्टर पंकज कुमार सांगतात, तोंडाला पदार्थांचा वास येऊ नये किंवा तोंडाचा सुगंध यावा यासाठी आपण बडीशेप आणि खडीसाखर खातो. बडीशेप अन्नपचनासाठी उत्तम असते. यात पचनासाठी उपयुक्त असे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होतं. परंतु जर जेवणाच्या आधी बडीशेप खाल्ली तर जास्त फायदेशीर ठरतं, कसं पाहूया.
advertisement
जेवणाआधी बडीशेप खाल्ल्यानं भूक जास्त लागते, त्यामुळे पोटात 2 घास जास्त जातात. परिणामी शरिराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळतात आणि त्यांचं पचनही व्यवस्थित होतं. शिवाय पोटात जळजळ होत नाही. जर शरिरात आग पडल्यासारखं वाटत असेल, भरपूर घाम येत असेल, लघवीच्या जागी जळजळ होत असेल तर बडीशेपचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
त्यासाठी सर्वात आधी बडीशेप पाण्यात उकळून गाळणीने गाळून घ्यावी. मग ही बडीशेप वेगळ्या पाण्यात भिजवून ते पाणी प्यावं. यामुळे बडीशेपमधले सर्व पोषक घटक पाण्यात मिसळतात. आपण बडीशेप पाण्यात वाटूनही खाऊ शकता. यामुळे शरिरातली उष्णता आणि पित्ताचा त्रास कमी होतो. आपल्याला नुसती बडीशेप खायला आवडत नसेल तर आपण त्यासोबत खडीसाखर, गूळ किंवा वेलची खाऊ शकता.
Location :
Gumla,Jharkhand
First Published :
August 27, 2024 1:43 PM IST