Cancer : शहरी पुरुषांमध्ये वाढतोय प्रायव्हेट पार्टसंबंधीत ‘हा’ गंभीर कॅन्सर, 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तो फक्त 60 वर्षांवरील पुरुषांमध्येच आढळतो असा समज होता. पण अलीकडील आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगतेय.
मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनियमित झोप, जंक फूडचं प्रमाण, व्यायामाचा अभाव आणि सतत स्क्रीनसमोर राहणं, या सगळ्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतच आहे. अनेक वेळा तरुण वयातच ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्मोनल असंतुलन आणि आता कॅन्सरसारखे गंभीर आजारही डोकं वर काढू लागले आहेत.
पूर्वी प्रोस्टेट कॅन्सर म्हटलं की तो फक्त 60 वर्षांवरील पुरुषांमध्येच आढळतो असा समज होता. पण अलीकडील आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगतेय. युनिक हॉस्पिटल कॅन्सर सेंटर, दिल्ली येथील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आशीष गुप्ता सांगतात की, आता 50 वर्षांखालच्या तरुण पुरुषांमध्येही प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
WHO चा अहवाल काय सांगतो?
advertisement
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2022 च्या अहवालानुसार, भारतात 37,948 नवीन प्रोस्टेट कॅन्सरची प्रकरणं नोंदवली गेली. ही देशातल्या एकूण कॅन्सर प्रकरणांपैकी सुमारे 3 टक्के आहेत.
प्रोस्टेट कॅन्सरची खरी समस्या ही आहे की, भारतात बहुतेक रुग्णांमध्ये या आजाराचं निदान उशिरा केलं जातं. अमेरिकेत जिथे 80% रुग्ण वेळेवर तपासणी करून उपचार घेतात, तिथे भारतात हे प्रमाण फारच कमी आहे.
advertisement
प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं काय?
लघवी करताना त्रास होणं
वारंवार लघवीला होणं (विशेषतः रात्री)
लघवी किंवा वीर्यात रक्त येणं
पाठी, कूल्ह्यांमध्ये किंवा पेल्व्हिक भागात वेदना
डॉ. गुप्ता सांगतात की, अनेक वेळा सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे दरवर्षी PSA टेस्ट (Prostate-Specific Antigen) करून घेणं फायदेशीर ठरतं. हे निदान लवकर झाल्यास उपचारही यशस्वी होतात आणि मृत्यूचा धोका टाळता येतो.
advertisement
लवकर जागरूक व्हा, वेळेत तपासणी करा आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत थोडेसे सकारात्मक बदल करा. कारण रोग हे वय पाहून येत नाहीत ते येतात, जेव्हा आपण दुर्लक्ष करतो.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 10, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : शहरी पुरुषांमध्ये वाढतोय प्रायव्हेट पार्टसंबंधीत ‘हा’ गंभीर कॅन्सर, 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका