Shivaji Maharaj Life Skills : शिवाजी महाराजांचे हे गुण आत्मसात करा, आयुष्यात येईल यश आणि कीर्ती..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा आपल्या शौर्याचा दाखला दिला आहे. शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात आपले शौर्य, लष्करी डावपेच आणि कौशल्य दाखवले.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मकता, मुत्सद्देगिरी, युद्धनीती, दूरदृष्टी, व्यावहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते. याद्वारे त्यांनी एकीकडे दक्षिणेतील बलाढ्य मुघलांचा विस्तार रोखला आणि दुसरीकडे त्यांनी एकत्र येऊन मराठा साम्राज्याची स्थापना केली. आज देशाला त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची गरज आहे. भारताच्या इतिहासात अनेक शूर राजे होऊन गेले. पण इतिहासात विशेष स्थान मिळविणारे फार थोडे आहेत.
यातील एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा आपल्या शौर्याचा दाखला दिला आहे. शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात आपले शौर्य, लष्करी डावपेच आणि कौशल्य दाखवले असले तरी. त्यांचे जीवन आजही आपल्याला आपले राष्ट्र मजबूत करण्यासाठी प्रेरणा देते. बलाढ्य मुघलांचा मुकाबला करत त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला, ज्याची त्याकाळी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती.
advertisement
प्रगल्भ विचार क्षमता : शिवाजी महाराजांचीविचारसगाक्ती खूप प्रगत आणि चिकित्सक होती. ते प्रत्येक गोष्टीमागील सत्य पडटाऊन पाहात. युद्धकाळात अनेक खोट्या बतामुलेही पसरवल्या जात. मात्र महाराजांनी कधीही भावनेच्या भरात युद्ध केले नाही. योग्य विचार करून धोरणे आखून मगच युद्धात उतरले.
सृजनशीलता : भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांचा गौरव होतो. महाराज खूप कल्पक विचारसरणीचे आणि सृजनशील म्हणजेच क्रिएटिव्ह होते. आरमार स्थापना हे त्यावेळी मोठे काम होते. आरमार उभारण्यामागे तीन कारणं होती. स्वराज्य विस्तार, स्थानिकांना रोजगार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण. जगाचा वेध घेण्याची क्षमता, जल व्यवस्थापन, युद्धनीती, परकीय संबंध, आर्थिक धोरणे या सर्वांमध्ये महाराजांची सर्जनशीलता दिसून येते.
advertisement
योग्यप्रकारे समस्येचे निराकरण करणे : महाराजांनी त्यावेळी स्वराजनिर्मितीचा ध्यास घेतल्यापासून त्यांच्या आयुष्यात समस्यांना कमतरता नव्हती. अशावेळी प्रत्येक समस्येवर विचार करून तिचे योग्य निराकरण करणे महाराजांना खूप चांगले जमायचे. अनेक पर्यायांचा विचार करून योग्य पर्याय निवडणे आणि समस्या सोडवणे म्हणजे तिचे निराकरण करणे होय.
निर्णयक्षमता : कोणत्याही माणसाच्या आयुष्यात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. ,महाराज ज्या परिस्थिती होते, तेव्हा त्यांच्याकडे निर्णयक्षमता असणे आवश्यक होते आणि ती त्यांच्याकडे होती. गरज असेल तेव्हा शत्रूवर चढाईचा निर्णय असो किंवा योग्य ठिकाणी माघार घेण्याचा निर्णय असो. हे महाराजांच्या युद्धनीतीचे सूत्र होते. अशीच मनुष्यबळाची हानी टाळण्यासाठी महाराजांनी मिर्झाराजे यांच्यासोबत तह करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
advertisement
समजून घेण्याची क्षमता : दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणे प्रसंगी स्वतःला त्याच्या जागी ठेऊन विचार करणे हे महाराजांना अगदी छान जमायचे. शिवाजी महाराजांनी अस्पृश्यता निवारण, गुलामगिरी, सतिप्रथा मोडून काढली. त्याचप्रमाणे महिला, शेतकरी, वंचितांना न्याय दिला. म्हणून तर अगदी सामान्य ते सामान्य माणसालाही महाराज आपले खूप जवळचे वाटायचे आणि लोक त्यांना प्रेमाने विश्वासाने 'छत्रपती' म्हणायचे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 18, 2024 6:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shivaji Maharaj Life Skills : शिवाजी महाराजांचे हे गुण आत्मसात करा, आयुष्यात येईल यश आणि कीर्ती..!