Vitamin D Deficiency Winter: हिवाळ्यात भेडसावते ‘व्हिटॅमिन डी’ ची समस्या, या गोष्टी खाऊन मिळवा ‘व्हिटॅमिन डी’

Last Updated:

Tips to get Vitamin D in Winter: हिवाळ्यात जर तुम्हाला सुद्धा ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेचा त्रास होत असेल तर जाणून घेऊयात कोणते अन्नपदार्थ खाल्ल्याने तुम्ही सूर्यप्रकाश नसताना थंडीतही तुम्ही ‘व्हिटॅमिन डी’ मिळवू शकता.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात जाणवते ‘व्हिटॅमिन डी’ ची कमी, खा 'या' गोष्टी
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात जाणवते ‘व्हिटॅमिन डी’ ची कमी, खा 'या' गोष्टी
मुंबई: देशासह राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शेकोट्या पुन्हा सुरू झाल्यात. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा 12 ते 15 अंशापर्यंत पोहोचलाय. तर उत्तर भारतात पारा हा शून्याच्या खाली गेलाय. कश्मीर, हिमाचल प्रदेशात तर बर्फवृष्टी होऊ लागलीये. अनेक राज्यांमध्ये तर सूर्यनारायणाचं दर्शन दुर्लभ झालंय. त्यामुळे अनेकांना ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेचा त्रास जाणवू लागला आहे.
मुळातच हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे अनेक जण ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेला बळी पडतात. त्यामुळे सांधेदुखीसह हाडांच्या दुखण्याचा त्रास वाढू लागतो. ‘व्हिटॅमिन डी’ च्या कमतरतेमुळे स्नायूंना बळकटी न मिळाल्याने ते कमकुवत होऊ लागतात. याचा सर्वात जास्त हा ‘बॉडी बिल्डर्स’ना होतो. आपल्या शरीरात विविध जीवनसत्त्वे तयार होत असली तरीही ‘व्हिटॅमिन डी’ मात्र हे तयार होत नाही. ते तयार करण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशावर अवलंबून राहवं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेचा त्रास होत असेल तर जाणून घेऊयात कोणते अन्नपदार्थ खाल्ल्याने तुम्ही सूर्यप्रकाश नसताना थंडीतही ‘व्हिटॅमिन डी’ मिळवू शकता.
advertisement
वरिष्ठ आहारतज्ञ कामिनी सिन्हा म्हणतात की, ‘व्हिटॅमिन डी’ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. ते हाडं मजबूत ठेवण्यास मदत करतं. ‘व्हिटॅमिन डी’ मुळे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण व्हायला मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही ‘व्हिटॅमिन डी’ मदत करतं. ‘व्हिटॅमिन डी’ च्या कमतरतेमुळे सांधेदुखी, हाडांचा त्रास हाडं ठिसूळ बनणं, ऑस्टिओपोरोसिस, अंगदुखी, थकवा, इतकच काय तर नैराश्याचा देखील सामना करावा लागू शकतो. ‘व्हिटॅमिन डी’ च्या कमकतरेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन विविध आजारांचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात जर सूर्यप्रकाशातून ‘व्हिटॅमिन डी’ मिळत नसेल तर ते पर्यायी स्रोतातून मिळवणं अत्यावश्यत ठरतं.
advertisement
‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेवर मात करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आहारातज्ज्ञ देतात. शाकाहारी आणि मासांहारी पदार्थातून ‘व्हिटॅमिन डी’ मिळवता येतं.

शाकाहारी पदार्थ :

advertisement
अंडी, दूध, दही, चीज,  मशरूम, पनीर आणि विविध प्रकारच्या फळांमधून ‘व्हिटॅमिन डी’ मिळवता येतं. यासह पालक, कारलं, दुधी सारख्या अनेक भाज्या सुद्धा ‘व्हिटॅमिन डी’ ने समृध्द असतात.

मासांहारी पदार्थ :

सॅलमन, ट्यूना आणि मॅकेरल सारख्या माशांमधून ‘व्हिटॅमिन डी’ मिळवू शकतात. अंड हे  सुद्धा ‘व्हिटॅमिन डी’चा चांगला स्रोत देखील मानला जातं.
advertisement

नैसर्गिकरित्या ‘व्हिटॅमिन डी’ कसं मिळवायचं?

‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता टाळण्यासाठी चांगला आहार हा महत्त्वाचा आहे हे आपण पाहिलंच मात्र नैसर्गिकरित्यासुद्धा ‘व्हिटॅमिन डी’ मिळवता येऊ शकतं. हिवाळ्यात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता टाळण्यासाठी दुपारी काही वेळ सूर्यप्रकाशात बसण्याच्या सल्ला तज्ज्ञ देतात. जर सूर्यप्रकाश अजिबात मिळत नसेल तर ‘व्हिटॅमिन डी’ सप्लिमेंट्स घेऊन ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करता येते. मात्र ‘व्हिटॅमिन डी’चं कोणतंही औषध किंवा गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण ‘व्हिटॅमिन डी’ जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास ते हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे ‘व्हिटॅमिन डी’ सप्लिमेंट्स घेताना सावधगिरी बाळगायला हवी.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D Deficiency Winter: हिवाळ्यात भेडसावते ‘व्हिटॅमिन डी’ ची समस्या, या गोष्टी खाऊन मिळवा ‘व्हिटॅमिन डी’
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement