Weight Loss : स्त्रियांना वजन कमी करण्यात अडथळे का येतात? वैज्ञानिक कारणांसह समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एकाच प्रकारचा डाएट किंवा एक्सरसाईज करत असूनही पुरुषांचं वजन झपाट्याने कमी होतं, पण महिलांचं मात्र तसंच राहतं… किंवा फारच हळूहळू कमी होतं. असं का?
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवशैलीमुळे अनेक आरोग्याशी संबंधीत समस्या तरुणपणातच लोकांना उद्भवू लागल्या आहेत. ज्यामुळे आता बहुतांश लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडं हेल्दी खाऊ पाहात आहेत, तर काही लोक जीममध्ये जात आहेत. पण अनेकदा असं दिसून येतं की एकाच प्रकारचा डाएट किंवा एक्सरसाईज करत असूनही पुरुषांचं वजन झपाट्याने कमी होतं, पण महिलांचं मात्र तसंच राहतं… किंवा फारच हळूहळू कमी होतं. असं का?
हा केवळ योगायोग नाही, तर यामागे वैज्ञानिक कारणं आहेत.
एनसीबीआयच्या संशोधनातून महत्त्वाचं सत्य समोर
एनसीबीआयमध्ये प्रकाशित 58 अभ्यासांपैकी 10 स्टडींमध्ये स्पष्ट केलं आहे की, महिलांसाठी वजन कमी करणं पुरुषांच्या तुलनेत अधिक कठीण असतं. यामागे मेटाबॉलिक (चयापचय प्रक्रिया) आणि हार्मोनल फरक कारणीभूत असतो.
सामान्यतः महिलांच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत जास्त चरबी (फॅट) आणि कमी स्नायू (मसल्स) असतात. यामुळे त्यांचा मेटाबॉलिज्म हळूगतीने कार्य करतो, ज्याचा थेट परिणाम वजन कमी होण्यावर होतो.
advertisement
थायरॉईड, पीसीओएस (PCOS) यांसारखे हार्मोनल विकार महिलांमध्ये जास्त आढळतात. हे विकार वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात आणि एकदा वजन वाढलं की पुन्हा ते कमी करणं महिलांसाठी अधिक आव्हानात्मक ठरतं.
2009 मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, पुरुषांना त्यांच्या क्रेव्हिंग आणि भुकेवर अधिक नियंत्रण ठेवता येतं, तर महिलांना त्यांच्यावर संयम ठेवणं तुलनेने कठीण जातं. त्यामुळेही महिलांच्या वेट लॉसमध्ये अडथळा निर्माण होतो.
advertisement
प्रेग्नेंसीदरम्यान महिलांचं वजन झपाट्याने वाढतं. संशोधन असं सांगतं की, ज्या महिलांचं या काळात वजन खूप वाढतं, त्यांना पुढील 20 वर्षांत जास्त वजन किंवा स्थायी लठ्ठपणाची शक्यता वाढते.
महिलांमध्ये मुख्यतः एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टीरोन हे सेक्स हार्मोन्स कार्यरत असतात. यांचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास भूक, फॅट स्टोअरेज, आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी करणं अधिक कठीण होतं.
advertisement
वजन कमी करणं म्हणजे केवळ डाएट नव्हे, तर शरीराच्या संपूर्ण यंत्रणेशी निगडित प्रक्रिया आहे. स्त्री-पुरुष शरीररचना, हार्मोन्स, आणि मेंटल फ्रेमवर्क या सगळ्यांचा परिणाम वेट लॉस प्रक्रियेवर होतो. त्यामुळे महिलांनी स्वतःला दोष देण्याऐवजी आपल्या शरीराची गरज समजून घेऊन योग्य पद्धतीने वेट लॉसच्या प्रक्रियेत सामील होणं आवश्यक आहे.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 07, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : स्त्रियांना वजन कमी करण्यात अडथळे का येतात? वैज्ञानिक कारणांसह समजून घ्या