'साहेब, पत्नी मिळवून द्या, उपकार विसरणार नाही', लग्नाळू तरुणाचं शरद पवारांना साकडं, पत्राचा शेवट सुन्न करणारा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
लग्न होत नसल्याने त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने थेट ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच भावनिक साकडं घातलं आहे.
अकोला : ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांच्या लग्नाची समस्या किती गंभीर होत चालली आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. लग्न होत नसल्याने त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने थेट ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच भावनिक साकडं घातलं आहे. त्याने शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवार यांच्याकडे पत्नी मिळवून देण्याची विनंती करणारे पत्र दिले, ज्यामुळे नेतेही स्तब्ध झाले.
शनिवारी (८ नोव्हेंबर) अकोल्यात शरद पवार गटाचा 'शेतकरी संवाद' कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला स्वत: शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, काहींनी निवेदने दिली. मात्र, या निवेदनांमध्ये एका तरुणाचे पत्र पाहून शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही क्षणभर विचार करायला लावले.
"मला जीवनदान द्या, तुमचे उपकार विसरणार नाही!"
advertisement
आपलं वय वाढत आहे, भविष्यात लग्न होणार नाही आणि आपण एकटेच राहू, या भीतीने त्रस्त झालेल्या अकोल्यातील तरुणाने पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाइल नंबर दिला आहे. तो अत्यंत नम्रपणे पवारांना विनंती करतो, "माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी."
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, असं तरुणाने पत्रात म्हटलं आहे. इतकेच नाही तर, "मी तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगलं काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो," असे त्याने पत्रात म्हटले आहे. या तरुणाने पत्राचा शेवट, "मला जीवनदान द्यावं, मी तुमचे उपकार विसरणार नाही," असं म्हटलं आहे. त्याच्या या पत्राबाबत शरद पवारांनी स्वत: जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Akola,Maharashtra
First Published :
November 13, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'साहेब, पत्नी मिळवून द्या, उपकार विसरणार नाही', लग्नाळू तरुणाचं शरद पवारांना साकडं, पत्राचा शेवट सुन्न करणारा


