छ. संभाजीनगरच्या कार्यपद्धतीला राज्यस्तरीय मान्यता, जिल्हाधिकारी स्वामींचा हा उपक्रम ठरला आदर्श
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल विभागात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी राबवलेली नवी कार्यपद्धती आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल विभागात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी राबवलेली नवी कार्यपद्धती आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. महसूल आणि वन विभागाने 10 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे हा निर्णय जाहीर केला.
15 मे 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासनासाठी तयार केलेले परिपत्रक अत्यंत परिणामकारक ठरले. संचिका निपटारा जलद झाला, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळू लागला आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनले. या यशस्वी अनुभवामुळे राज्य शासनाने ही कार्यपद्धती सर्व जिल्ह्यांत अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
या उपक्रमामुळे महसूल विभागातील कामकाज अधिक जलद आणि सुसंगत होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराचे राज्यभर कौतुक होत आहे. अधिकारीवर्ग आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी स्वामी यांचे अभिनंदन करत संभाजीनगर प्रशासनाने संपूर्ण राज्याला दिशा दाखवली अशी प्रतिक्रिया दिली आहे.
परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे
मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकात मंडळ अधिकारी आणि महसूल सहाय्यकांचे अधिकार स्पष्ट करण्यात आले. मंडळ कार्यालयांमध्ये नियमित उपस्थिती, कामकाजाचे ठराविक दिवस आणि जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन यावर भर देण्यात आला. यामुळे तलाठी आणि तहसीलदारांमधील समन्वय सुधारला आणि प्रकरणांच्या निपटाऱ्यात गती आली.
advertisement
राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार, सहा महिन्यांच्या आत सर्व जिल्हाधिकारी या कार्यपद्धतीचा आढावा घेणार आहेत. तसेच प्रत्येक मंडळ कार्यालयाला आपले सरकार केंद्र मंजूर करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
जिल्ह्याचा अभिमानाचा क्षण
view commentsमहसूल प्रशासनात सुधारणा घडवणाऱ्या या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या प्रयत्नांमुळे केवळ प्रशासनात बदल झाला नाही, तर नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे. शासनाने या कार्यपद्धतीला राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
October 13, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरच्या कार्यपद्धतीला राज्यस्तरीय मान्यता, जिल्हाधिकारी स्वामींचा हा उपक्रम ठरला आदर्श