'गोकुळ'च्या राजकारणात पैशांचा खेळ, एक ठरावधारक अन् 5 लाखांची बोली, 'पैसे घेतलं तर चुकलं कुठं'ची गावागावात चर्चा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Gokul Politics in Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) निवडणूक आता 'अर्थपूर्ण' बनली आहे. गावागावातील दूध संस्थांच्या एका ठरावासाठी पाच लाख रुपयांपर्यंत बोली लागत असल्याची धक्कादायक...
Gokul Politics in Kolhapur : गोकुळ दूध संघाची निवडणूक आता 'अर्थपूर्ण' वळणावर पोहोचली आहे. गावागावातील दूध संस्थांच्या एका ठरावासाठी तब्बल पाच लाख रुपयांची बोली लागत असल्यामुळे या निवडणुकीतील गैरव्यवहार चर्चेचा विषय बनला आहे. सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या पैशांच्या खेळामुळे आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांसारख्या नेत्यांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते.
निवडणुकीची तयारी सुरू
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ (गोकुळ) हा राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये याची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. गोकुळसाठी मतदान करणारी व्यक्ती ही गावातील दूध संघांच्या ठरावधारकांमधून निवडली जाते. सध्या हेच ठरावधारक आपल्या बाजूने वळवण्यासाठी सत्ताधारी गट जोरदार प्रयत्न करत आहे.
advertisement
ठरावांसाठी पैशांची उधळण
सत्ताधारी गटाने ठरावधारक प्रतिनिधींना 'नजराणा' म्हणून 50 हजार रुपये देऊ केले आहेत. कळे (ता. पन्हाळा) येथील धर्मराज सहकारी प्राथमिक दूध संस्थेच्या सभेत तर एका ठरावासाठी दोन गट एकमेकांवर भिडले. एका गटाने एक लाख रुपये देण्याची तयारी दाखवली, तर दुसऱ्याने थेट पाच लाख रुपयांची बोली लावली. जर एका ठरावासाठी पाच लाख रुपये मोजले जात असतील, तर गोकुळच्या एकूण साडेसहा हजार संस्थांचे ठराव गोळा करण्यासाठी किती पैसा खर्च होईल, याची चर्चा गावागावात सुरू आहे.
advertisement
नैतिकतेचा प्रश्न
गोकुळमधील संचालक झाल्यावर त्यांचा व्यवसाय कसा भरभराटीला येतो, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे, नेत्यांचे राजकारण आपल्या मतांवर अवलंबून असेल, तर आपण आपल्या मताची किंमत का वसूल करू नये, असा प्रश्न ठरावधारक विचारत आहेत. या प्रकारामुळे निवडणुकीची नैतिकता धोक्यात आली असून, राजकारण अधिकच गढूळ होत असल्याची टीका केली जात आहे.
advertisement
हे ही वाचा : 'आमदार आम्ही, तर 30+ जागाही आम्हालाच हव्यात', कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेने सांगितला 'हक्क'
हे ही वाचा : Kolhapur Politics : राहुल गांधी 'हीन', तर मोदी 'विकासा'चं राजकारण करताहेत; धनंजय महाडिकांची थेट टिका!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'गोकुळ'च्या राजकारणात पैशांचा खेळ, एक ठरावधारक अन् 5 लाखांची बोली, 'पैसे घेतलं तर चुकलं कुठं'ची गावागावात चर्चा!