advertisement

Manoj Jarange Patil : '..तर 12 तारखेनंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
हिंगोली, (सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी) : मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. "छगन भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत. सर्वांना काय भाषण करायचं हे वाटून दिलंय. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मराठ्यांना कमजोर समजू नका. येत्या 13 तारखेपर्यंत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या नाहीतर त्यानंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते आज हिंगोली येथील मेळाव्यात बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही सरकारवर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय उसळेल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांनी आज पासून मराठवाड्याच्या दौरा सुरू केला.
advertisement
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
तुमचं लेकरू म्हणून मनापासून आभार मानतो. हिंगोलीच्या मराठ्यांनी मराठ्यांची शान राखली. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी उन्हात समाज आला आहे. एका छगन भुजबळचे ऐकून अन्याय कराल तर याद राखा. नाहीतर 288 पैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा इशारा जरांगे पाटील म्हणाले. सरकारने शहाणपण दाखवण्याची वेळ आहे. आपली एकच मागणी आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. सगे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी आमच्या व्याख्यानुसार करा. 180 जातीच्या पोटजाती म्हणून अनेक जाती आरक्षणात घातल्या. आम्ही कुणबी म्हणून 83 नुसार मराठा आरक्षण का नको? 57 लाख नोंदी सापडल्याचं सरकारने लेखी दिलं आहे. कैकाडी समाजाची तर व्यथा फार वेगळी आहे. विदर्भात कैकाडी समाज एससीमध्ये आहे. खानदेशामध्ये एसटीमध्ये आणि तोच समाज मराठवाड्यात आला की ओबीसी होतो, असं मंडल आयोगाने करुन ठेवलं आहे.
view comments
मराठी बातम्या/हिंगोली/
Manoj Jarange Patil : '..तर 12 तारखेनंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा इशारा
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement