Jayant Patil : जयंत पाटील यांचा राजीनामा? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी उलथापालथ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jayant Patil : पुण्यातील बालगंधर्व सभागृहात शरद पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात मोठी घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (10 जून) 26 वा वर्धापन दिन मोठ्या राजकीय घमासानाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यातील बालगंधर्व सभागृहात शरद पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात मोठी घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केले.
जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून देण्यात आली होती. जवळपास सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकरत होते. 9 जानेवारी 2025 रोजी जयंत पाटील यांनी थोडे दिवस थांबा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा मला या जबाबदारीतून मोकळं करा म्हणत राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
advertisement
जयंत पाटील यांनी काय म्हटले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या वाटचालीवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विविध आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या भाषणाचा समारोप करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, शरद पवारांनी मला संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून 7 वर्ष राहिलो, जबाबदारी सांभाळली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यांनी असे वक्तव्य करताच सभेत घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार आपले नेते असून अंतिम निर्णय ते घेतील असे म्हटले.
advertisement
आजच्या भाषणातून जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केल्याने खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी याआधीदेखील केली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 10, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jayant Patil : जयंत पाटील यांचा राजीनामा? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी उलथापालथ