महायुतीच्या नेत्याचं मोठं विधान, ओम राजे निंबाळकरांना काढला चिमटा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अर्चना पाटील दोन लाखाच्या फरकाने विजयी होईल एवढेच नाही तर राज्यात देखील महायुती बेचाळीसच्या पुढे लोकसभेत जागा जिंकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
धाराशिव, प्रतिनिधी बालाजी निरफळ : राज्याचे आरोग्य मंत्री धारशिवचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी मुगाव इथे मतदानाचा हक्क बजवला आहे. धाराशिव जिल्ह्यात भावनिकतेला मूठ माती देत जनता विकासाचे राजकारण स्वीकारणार असल्याचा सांगत ओम राजे निंबाळकर यांना सावंत यांनी टोला लगावला आहे.
धाराशिव राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगाव येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तानाजी सावंत यांनी लाईनमध्ये उभं राहत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. धाराशिव जिल्ह्यातील जनता यंदा भावनिक राजकारणाला मूठ माती देऊन विकासाचे राजकारण स्वीकारणार असल्याचं सांगितलं. त्यांनी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
advertisement
अर्चना पाटील दोन लाखाच्या फरकाने विजयी होईल एवढेच नाही तर राज्यात देखील महायुती बेचाळीसच्या पुढे लोकसभेत जागा जिंकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान उन्हाचा पारा वाढला असला तरी लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे अशी आव्हान पालकमंत्री यांनी केले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 7 वाजता बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अजित पवार, सुशील कुमार शिंदे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर महाराष्ट्रातही तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान झालं आहे.,
advertisement
12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे 2024 रोजी सकाळी 7.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31 .55 टक्के मतदान झाले आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
May 07, 2024 3:12 PM IST