तुम्ही महापालिका निवडणुकीत मतदान करू शकता? कधीपर्यंतची यादी ग्राह्य धरणार? आयोगाची मोठी अपडेट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयुक्त सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महापालिकांसह २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होईल तर १६ जानेवारीला मतमोजणी पार पडेल.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयुक्त सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार आहेत. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दुहेरी तारांकित (डबल स्टार) असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तुम्ही महापालिका निवडणुकीत मतदान करू शकता?
मतदार यादीच्या अनेक आक्षेपांवरून राजकीय पक्षांच्या अनेक बैठका राज्य निवडणूक आयुक्तांशी आणि अधिकाऱ्यांशी पार पडल्या होत्या. डिसेंबर अखेरची मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. मात्र आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमावेळी राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतची यादी ग्राह्य धरण्यात येईल, असे सांगितले. याचा अर्थ १ जुलै २०२५ नंतर नोंदवलेल्या नावांना मतदान करता येणार नाही.
advertisement
कोणतेही नाव डिलिट करणे किंवा अॅड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही
-मतदार यादी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी वापरणार
-मतदार प्रभागनिहाय विभाजित करण्यात आली आहे
-मतदार यादी भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतली असल्याने कोणतेही नाव डिलिट करणे किंवा अॅड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही
-मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी प्रचार यंत्रणा बंद करण्यात याव्यात.
advertisement
-स्टार प्रचारकांची यादी २० वरून ४० वर
कोणत्या महापालिका उमेदवारांसाठी किती खर्च करण्याची मर्यादा?
अ- वर्ग १५ लाख
ब वर्ग- १३ लाख
क वर्ग- ११ लाख
ड वर्ग- ९ लाख
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्ही महापालिका निवडणुकीत मतदान करू शकता? कधीपर्यंतची यादी ग्राह्य धरणार? आयोगाची मोठी अपडेट








