Man Khatav Vidhan Sabha: आमदार गोरे यांच्यासमोर देशमुखांचं आव्हान! माणमध्ये विरोधकांनी ताकद एकवटल्याने लढाई चुरशीची होणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Maharashtra Assembly Election 2024 Man Khatav Assembly Constituency : सलग टीन टर्म निवडून येणारे विद्यमान आमदार जयकुमार गोरे या वेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवारांनी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
सातारा : जिल्ह्यातला दुष्काळी भाग असणाऱ्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होणार अशी चिन्हं आहेत. सलग टीन टर्म निवडून येणारे विद्यमान आमदार जयकुमार गोरे या वेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवारांनी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने देशमुखांपाठी ताकद लावल्याने गोरे विरुद्ध देशमुख सामना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रंगणार आहे.
माण खटाव विधानसभा मतदारसंघ इतिहास
माण-खटाव विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यात येतो आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, माण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण तालुका आणि खटाव तालुक्यातील अढी, वडुज, कटार, खटाव आणि मायणी या महसूल मंडळांचा समावेश होतो.
2009 साली पुनर्ररचना झाल्यापासून या मतदारसंघातून जयकुमार गोरे आमदार म्हणून निवडून येत आहेत. पण 2009 मध्ये ते अपक्ष म्हणून लढले होते. 2014 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात होते आणि निवडून आले. तर 2019 च्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर जिंकून आले. भाजपने पुन्हा एकदा गोरे यांना संधी दिली आहेत आणि ते यंदा महायुतीचे उमेदवार आहेत.
advertisement
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
जयकुमार गोरे – भाजप – 91,469
प्रभाकर देशमुख – अपक्ष - 88,426
2019 मध्ये झाली तशीच लढत याही वर्षी अपेक्षित आहे. फक्त या वेळी प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणुकीत आहेत आणि महाविकास आघाडीचं बळ त्यांना मिळणं अपेक्षित आहे. 2019 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढवताना गोरे यांना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात फक्त 2955 मतांची आघाडी त्यांना मिळाली होती आणि त्यांचा निसटता विजय झाला होता.
advertisement
2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?
माण-खटाव हा भाग लोकभेच्या माढा मतदारसंघात येतो. 2024 लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी मतदार संघातून नाईक निंबाळकर यांना 23365 मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले. त्यामुळे विधानसभेसाठी जयकुमार गोरे यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी केलेले प्रयत्नसुद्धा गोरे यांच्या कामी येतील. मात्र विरोधकांकडून होणाऱ्या टोकाच्या आरोपांचं ते खंडन कसं करतात आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा कसा परिणाम होतो यावर गोरे यांचं चौथं यश अवलंबून असेल.
advertisement
सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांची भूमिका
- सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप
- वाई - मकरंद पाटील – राष्ट्रवादी
- फलटण- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
- माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप
- कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना
- कराड उत्तर - बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
- कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस
- पाटण - शंभुराजे देसाई – शिवसेना
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
November 13, 2024 3:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Man Khatav Vidhan Sabha: आमदार गोरे यांच्यासमोर देशमुखांचं आव्हान! माणमध्ये विरोधकांनी ताकद एकवटल्याने लढाई चुरशीची होणार