जहाल माओवादी सुमित्रा वेलादी गोळीबारात ठार, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maoist Sumitra Veladi: चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये गट्टा दलम कमांडर असलेली जहाल माओवादी सुमित्रा वेलादीचा समावेश असून गेल्या पंधरा वर्षापासून तिच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस होते.
महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली : जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्या आहेत. गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेडसकेच्या जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या कमांडो पथकांनी आज सकाळपासूनच त्या परिसराची घेराबंदी केली होती.
आज चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये गट्टा दलम कमांडर असलेली जहाल माओवादी सुमित्रा वेलादीचा समावेश असून गेल्या पंधरा वर्षापासून माओवादी संघटनेत असलेल्या सुमित्रा वेलादीवर १६ लाख रुपयांचे बक्षीस आहे. तिच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून ती जहाल महिला माओवादी नेता नर्मदाक्काची अंगरक्षक म्हणूनही काही वर्ष कार्यरत होती. सध्या ती गट्टा दलमची कमांडर म्हणून सक्रीय होती.
advertisement
दरम्यान पोलीस जवान आणि माओवादी यांच्यादरम्यान दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या गोळीबारात दोन महिला माओवाद्यांना ठार मारण्यात गडचिरोली पोलिसांच्या जवानांना यश मिळाले आहे. घटनास्थळी ए के ४७ अत्याधुनिक बंदुकीसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. माओवादींजवळील शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आले. घटनास्थळावर गडचिरोली पोलिसांकडून अजूनही कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
September 17, 2025 4:01 PM IST