महाराष्ट्रातील 72 आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये कुणी अडकवलं? मास्टरमाईंड कोण? समोर आली धक्कादायक माहिती!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Maharashtra Honey Trap Scandal : नाशिकमधील एका राजकीय कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात अडकवल्याच तपासात समोर आलं आहे. अशातच या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ कोण? असा सवाल विचारला जात आहे.
Maharashtra Nashik Honey Trap Scandal : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचा गोपनीय तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्री देखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक, सहायक आयुक्त, पोलिस उपायुक्त, पोलिस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकार्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागणार्या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे फक्त नाशिकच नाही संपूर्ण राज्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.
‘मास्टरमाईंड’ कोण?
नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील या अधिकाऱ्याला ठाण्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिलेच्या मदतीने नाशिकमधील एका राजकीय कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात अडकवल्याच तपासात समोर आलं आहे. अशातच या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ कोण? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
मास्टरमाईंड नाशिकचाच...
राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर, या ट्रॅपचा ‘मास्टरमाईंड’ हा नाशिकचाच असल्याचे समोर येत असून, तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतची वाच्यता केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.
advertisement
अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता
हा प्रकार ज्या हॉटेलमध्ये घडला, त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. यातून प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. या हनी ट्रॅप प्रकरणाच्या पुन्हा सुरू झालेल्या गोपनीय तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची वाच्यता होताच, राज्यातील अनेक अधिकारी समोर आले आहेत. यात महसूल विभागातील सर्वाधिक अधिकारी गुंतल्याची माहिती मिळत आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढलं आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
July 16, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
महाराष्ट्रातील 72 आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये कुणी अडकवलं? मास्टरमाईंड कोण? समोर आली धक्कादायक माहिती!