Tanaji Sawnat : तानाजी सावंतांची नाराजी कायम; निमंत्रण देऊन देखील गैरहजर, मतदारसंघाकडे फिरवली पाठ!

Last Updated:

मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज आहेत. त्यांनी या अगोदर पक्षाच्या मेळाव्याला ही दांडी मारली होती.

News18
News18
धाराशिव:  विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.परंतु मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात नाराजी दिसून आली. महायुतीमधील तीनही पक्षांनी गेल्या सरकारमधील अनेक मंत्र्यांना वगळून नवीन चेहऱ्याना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे. विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेतील तीन मंत्र्यांना वगळण्यात आल्याने त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत गेल्या दीड महिन्यापासून नाराज असल्याची चर्चा आहे.
धाराशिव माजी मंत्री तथा भूम परंडा वाशीचे शिवसेना पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिले आहेत. पालकमंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक 26 जानेवारीच्या दिवशी आयोजित केली होती. या बैठकीला आमदार म्हणून तानाजी सावंत यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज आहेत. त्यांनी या अगोदर पक्षाच्या मेळाव्याला ही दांडी मारली होती.
advertisement

नाराजीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न

मंत्रिपद डावल्यानंतर तानाजी सावंत हे एकदाही मतदार संघाकडे फिरकले नाहीत. ते आजच्या बैठकीला येतील अशी आशा होती पण त्यांनी बैठकीला ऐनवेळी दांडी मारली. रात्री प्रताप सरनाईक शहरात दाखल झाले त्यावेळी पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचे फोटो देखील हटवण्यात आले होते. या सगळ्या प्रकारावर प्रताप सरनाईक यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत तानाजी सावंत हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते नाराज नाहीत. काही गोष्टी कुटुंबात होत असतात ते चालत राहतं असं सांगत त्यांनी सावंत यांच्या नाराजीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
advertisement

धाराशिवसह इतर जिल्ह्यात प्रवेश होण्याचे संकेत

धाराशिव राज्याच्या व धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात येणाऱ्या काळात बदल झाला तर वाव वाटू देऊ नका असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. 80 जागा घेतल्या त्यात 60 जागा जिंकल्या त्यामुळे जनतेने खरी शिवसेना आहे. आता पुढील काळात राज्यात व धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात काही बदल झाले तर वावगं वाटू नये असं वक्तव्य सरनाईक यांनी करत शिवसेना पक्षात पुढील काळात धाराशिवसह इतर जिल्ह्यात प्रवेश होण्याचे संकेत दिले आहेत
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tanaji Sawnat : तानाजी सावंतांची नाराजी कायम; निमंत्रण देऊन देखील गैरहजर, मतदारसंघाकडे फिरवली पाठ!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement