ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर, बेकायदेशीर 3 हुक्का पार्लरवर कारवाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
ठाणे शहर पोलिसांनी शहरातील 3 बेकायदेशीर हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर धडक कारवाई केली. ठाणे पोलीस दलाकडून अनेक बेकायदेशीर बाबींवर कारवाई करणे सुरू आहे.
ठाणे : सद्या मोठमोठ्या शहरांत अनेक बेकायदेशिर कामे सुरू आहेत. तरुणांच्या वाईट सवयी वाढत असल्याने ते हुक्का आणि अशा बऱ्याच व्यसनाच्या आहारी जात आहे. याचाच फायदा घेऊन शहरात अनेक हुक्का पार्लर सुरू करण्यात आले आहे. त्यातील काही बेकायदेशीर सुद्धा आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ठाण्यातील 3 हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत 3 पार्लरवर कारवाई
ठाणे शहर पोलिसांनी शहरातील तीन बेकायदेशीर हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर धडक कारवाई केली. ठाणे पोलीस दलाकडून अनेक बेकायदेशीर बाबींवर कारवाई करणे सुरू आहे. ठाण्यात 2025 च्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण 3 हुक्का पार्लरवर छापे टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यावर कायद्यानुसार गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहे.
advertisement
बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘झिरो टोलरन्स’ हे धोरण
view commentsठाणे शहरातील तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गुप्त तपासणी सुरू आहे. शहरात अशा ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस यंत्रणेने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘झिरो टोलरन्स’ हे धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम आणखी वेगाने राबविण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी दिली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
April 08, 2025 9:00 PM IST








