Women Success Story: शिक्षण बारावी पास, आयुष्यात संकट आली पण खचल्या नाही, कॉस्मेटिक ब्रँडमधून आता करतात महिन्याला 1 लाख कमाई, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
रोहिणी यांचे स्वतः चे तब्बल 65 कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत . त्यांच्या या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या इतर महिलाना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
नाशिक: नवऱ्याने दुसरे लग्न केले नातेवाईकानी देखील एकटे सोडले. तरी देखील खचली नाही मुलासाठी जगावं आणि त्याला मोठा करावं यासाठी नेहमी लढत राहिली. मिळेल ते कामे देखील केली आणि कॉस्मेटिक क्षेत्रात अभ्यास करून नचरल नावाचा स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँड तयार केला आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या रोहिणी पाटील यांची. आज रोहिणी यांचे स्वतः चे तब्बल 65 कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत . त्यांच्या या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या इतर महिलाना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
रोहिणी यांच्या लग्नांनंतर काहीच वर्षात त्यांच्या नवऱ्याने त्याना सोडून दुसरे लग्न केले. त्यावेळी रोहिणी याना एक छोटा मुलगा होता. नवऱ्याने सोडले तर तुझाच काही दोष असेल असे म्हणून नातेवाईक देखील सारखे हिणवत असत. यामुळे रोहिणी यांनी अनेक वेळेस आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु आपल्या मुलाकडे पाहून त्या नेहमी स्वतःहाल सावरत असत.
advertisement
Success Story: आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केलं फूड आऊटलेट, महिन्याला तब्बल एवढी कमाई
नवरा सोडून गेला या करता माहेरच्या मंडळीनी रोहिनी यांना आपल्या गावी नाशिकला आणले आणि यानंतर रोहिणी या मुलाचा सांभाळा आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी नोकरी शोधू लागल्या. त्यानंतर कळाले की नाशिकमध्ये अकाउंटिंग या क्षेत्रात मोठी संधी आहे. या करता त्यांनी अकाउंटिंगचे क्लासेस लावले. क्लासेस लावण्यासाठी देखील त्यांनी एका कापड दुकानात कामे केले. आणि त्यातून आलेल्या पैश्यातून त्यांनी आपले क्लासेस पूर्ण केले.
advertisement
12 वी पास असल्याने त्याना इंग्लिशन बोलणे सोपे होते तर दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या बऱ्याच नागरिकांशी त्या इंग्लिशमध्ये सवाद करत असत. ही बाब लक्षात घेता त्याना त्यांच्या दुकान मालकाने अकाउंटमध्येच नोकरी दिली असल्याने त्या सांगतात. त्यानंतर काही वर्षात वडील वारले आपले ओझे भावांवर नको म्हणून त्यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरविले.
advertisement
त्यानंतर त्यांनी सारखी येथील शिक्षकाशी लग्न केले. सुखी संसार सुरू झाला. परंतु आपण आपल्या पायावर उभे राहू ही जिद्द त्यांनी मनात बांधून घेतली असता त्या स्वतःच्या शेतात ते काम करत असतं. आपल्या मुलाच्या शिक्षणाला लागणार पैसा आपण स्वतः त्याला देऊ शकू या करता त्या काम करत असत.
advertisement
शेतात काम करत असताना त्यांची त्वचा ही काळी पळू लागली. लोक नावे ठेवतील म्हणून त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून काही उपाय शोधले. त्या वेळी त्याना कॉम्सेटिक या क्षेत्रात आपण करियर करू शकतो असे सुचले. त्यांनी या बद्दल अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी क्लास केले या माध्यमातून प्रॉडक्टक देखील बनून लागल्या. आणि ते विक्री सुद्धा होऊ लागले. आज बघता बघता रोहिणी यांनी स्वतःचे 65 कॉस्मेटिक प्रोडक्ट बनविले आहेत.
advertisement
इतकेच नाही तर आज त्या आपले हे प्रोडक्ट मार्किटमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात विक्री करत आहेत. आज या वस्तूंच्या माध्यमातून त्या महिन्याला 1 लाखापेक्षा अधिक कमाई करत आहेत. इतकेच नाहीतर इतराना देखील त्या रोजगार देतात.
यांच्याकडे कॉस्मेटिक्स (सौंदर्यप्रसाधने) मिनी लिपस्टिक सेट हा 300 रुपये तसेच लिपस्टिक 99 लिप बाम, काजळ, बेबीक्रीम, कॉम्पॅक्ट पावडर विथ कंसीलर फक्त 250 एचडी पावडर 300 मिळत असते. तसेच स्किनकेअर प्रॉडक्ट्स अॅलोवेरा जेल 1 किलो, 500 रुपयाला हे देत असतात.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 20, 2025 2:14 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: शिक्षण बारावी पास, आयुष्यात संकट आली पण खचल्या नाही, कॉस्मेटिक ब्रँडमधून आता करतात महिन्याला 1 लाख कमाई, Video