एकेकाळी अभिनेत्रीने दिली होती स्वतःच्याच हत्येची सुपारी, आज 6 मुलांची आई! संपत्तीचा आकडा पाहून बसेल शॉक!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actress Shocking Revelation : या अभिनेत्रीला काही असे धक्कादायक छंद आहेत, ज्यांची कल्पना करणेही कठीण आहे. एका प्रसंगी तर तिने चक्क स्वतःच्या मृत्यूची सुपारी दिली होती.
अभिनेत्री ऐश्वर्या रायला आजही बॉलीवूडमधील सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. पण तुम्हाला ठाऊक आहे का, जगभरात एक अशी अभिनेत्री आहे जिची क्रेझ ऐश्वर्यापेक्षाही खूप जास्त आहे! तिचे सौंदर्य इतके मोहक आहे की, चाहते तिचे वर्णन करताना कधीच थकत नाहीत. मात्र, या अभिनेत्रीला काही असे धक्कादायक छंद आहेत, ज्यांची कल्पना करणेही कठीण आहे. एका प्रसंगी तर तिने चक्क स्वतःच्या मृत्यूची सुपारी दिली होती, हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल!
advertisement
हॉलीवूड सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्याबद्दल भारतात फारशी माहिती नसते. पण, एक हॉलीवूड अभिनेत्री अशी आहे, जिचे चाहते फक्त अमेरिकेतच नाही, तर भारतातही कोट्यवधींच्या घरात आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अँजेलिना जोली (Angelina Jolie) आहे. हॉलीवूडमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ती एक आहे. सौंदर्याच्या बाबतीतही अँजेलिना कोणापेक्षा कमी नाही.
advertisement
अँजेलिनाने पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांवर जादू केली, पण तिचे वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिले. सध्या तिची संपत्ती तब्बल ९९६ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे म्हटले जाते. तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर, तिने तीनदा लग्न केले आणि तिन्ही लग्ने तुटली. अँजेलिना जोली ही सहा मुलांची आई आहे. अलीकडेच, १४ वर्षांनंतर अँजेलिनाने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. क्रिस्टल-स्टडेड गाऊनमधील तिचा लूक सर्वांनाच भुरळ घालणारा होता.
advertisement
advertisement
पण, याहूनही धक्कादायक म्हणजे, एका मुलाखतीत अँजेलिनाने स्वतःच खुलासा केला होता की, २० वर्षांची असताना तिने एकदा स्वतःला मारण्यासाठी एका खुनीला सुपारी दिली होती. यामागचे कारण सांगताना ती म्हणाली होती की, तिला वाटले होते की, जर तिची हत्या झाली, तर तिच्या कुटुंबियांना आणि मित्रांना तिच्या आत्महत्येपेक्षा जास्त दुःख होणार नाही. हा विचार तिच्या आयुष्यातील एका अत्यंत अंधाऱ्या टप्प्यातील होता.
advertisement
अँजेलिनाने वयाच्या १४ व्या वर्षीच अभिनयाला सुरुवात केली. १९९२ मध्ये तिने वडील जॉन व्होइट यांच्यासोबत 'लुकिंग टू गेट आउट' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. १९९९ मधील 'गर्ल, इंटरप्टेड' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी तिला 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कारही मिळाला आहे. अँजेलिना जोलीचे आयुष्य हे ग्लॅमर, यश आणि काही धक्कादायक रहस्यांनी भरलेले आहे, जे तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक करतं.