Govinda - Sunita Divorce : 'गणेश चतुर्थीची वाट बघा', गोविंदाच्या डिवोर्सवर मॅनेजरचा मोठा खुलासा; सस्पेन्स वाढला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Govinda-Sunita Divorce : अभिनेता गोविंदा आणि सुनिता यांच्या डिवोर्स प्रकरणात मॅनेजर शशि सिन्हा यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी समोर येत दोघांच्या डिवोर्सबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शशि यांनी सांगितलं की, गोविंदा कोर्टात हजर झाले नाहीत. सुनीता देखील फक्त एकदाच कोर्टात गेल्या होत्या तेव्हा त्यांनी केस फाईल केली होती. कुठल्या कपलमध्ये प्रॉब्लेम नसतो? सुनीता गोविंदावर खूप प्रेम करतात आणि दोघेही एकत्र आहेत. त्यांचा डिवोर्स होणार नाही. दोघेही आपल्या मुलांच्या करिअर आणि लग्नावर फोकस करत आहेत.
advertisement
शशि पुढे म्हणाले, "फक्त व्यूज मिळवण्यासाठी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जात आहेत. यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. गोविंदाने कधीच सुनीता बद्दल वाईट बोलले नाही. काही मुलाखतीत सुनिताकडून गोविंदाविरोधात चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. आता गणेशोत्सव येत आहे तुम्हाला सगळे एकत्र दिसतील. तुम्ही घरी या."
advertisement