हाडं होतील भक्कम, थंडीत उठता-बसता आकडणार नाही अंग, खा Vitamin D देणारे पदार्थ!

Last Updated:
Vitamin D Sources: आजकाल आयुष्य एवढं धावपळीचं झालंय की, सकाळी निवांत उन्हात बसायला वेळच नसतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळत नाही. परिणामी कमी वयात अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. या त्रासावरच आज आपण उपाय जाणून घेणार आहोत. 
1/5
थंडी पडू लागली की, हात-पाय आकडतात, त्यामुळे हाडं दुखू लागतात, मग सहज उठता-बसता येत नाही. याला कारणीभूत असू शकते व्हिटॅमिन डीची कमतरता. स्वच्छ सूर्यप्रकाश मिळवण्यासह आपण आहारात काही खास पदार्थांचा समावेश करून ही कमी नक्कीच भरून काढू शकता. 

advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर पूनम राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्कम हाडांसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असतं. ते मिळवण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटं उन्हात बसावं. तसंच आहारात हेल्थी पदार्थांचा समावेश करावा. 

3/5
जर तुम्ही मांसाहार करत असाल, तर मासे आणि मटणातून सर्वाधिक पोषक तत्त्व मिळू शकतं. यात व्हिटॅमिन डी भरभरून असतं. त्यामुळे हाडं भक्कम राहू शकतात. तसंच अंगदुखीही बरी होऊ शकते. 

4/5
डॉक्टरांनी सांगितलं की, आहारात अंड्यांचाही समावेश करावा. अंड्यांमध्ये प्रोटीनसह व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं प्रचंड भक्कम होऊ शकतात. 

5/5
जर आपण शाकाहार करत असाल तर आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. आपण जास्तीत जास्त पनीर, दूध, बटर, चीज खाऊ शकता. त्यातूनही भरपूर व्हिटॅमिन डी मिळून हाडं भक्कम होऊ शकतात. दूध तर दररोज पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement