Mango : बाहेरून चांगला पण आतून खराब असलेला आंबा कसा ओळखायचा? फक्त 2 ट्रिक्स वापरा लगेच कळेल

Last Updated:
उन्हाळा हा आंब्यांचा सिझन असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असते. अनेक ग्राहक डझनभर आंबे खरेदी करून घरी नेतात. आंब्यांमध्ये हापूस आंबा हा अतिशय अप्रतिम दर्जाचा मानला जातो. परंतु काहीवेळा बाहेरून टवटवीत दिसणारे आंबे आतून मात्र खराब निघतात. अशावेळी खरेदी करताना आतून खराब असलेला आंबा कसा ओळखायचा याविषयी काही टिप्स जाणून घेऊयात.
1/5
कॅलिफोर्निया 30 फार्म्स या युट्युब चॅनलने एका व्हिडीओद्वारे आतून खराब असलेले आंबे नेमके कसे ओळखावेत याविषयी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हापूस आंबा खरेदी करताना त्याचा आकार नीट पाहावा.
कॅलिफोर्निया 30 फार्म्स या युट्युब चॅनलने एका व्हिडीओद्वारे आतून खराब असलेले आंबे नेमके कसे ओळखावेत याविषयी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हापूस आंबा खरेदी करताना त्याचा आकार नीट पाहावा.
advertisement
2/5
जर आंब्याचा आकार हा थोडा उभट असेल तर असे आंबे आतूनही चांगले असतात. त्याच उलट जर हापूस आंब्याचा आकार हा साधारण गोलाकार असेल तर असा आंबा बाहेरून चांगला दिसत असला तरी आतून खराब निघण्याची शक्यता असते.

3/5
खराब आंबा ओळखण्याची दुसरी टीप म्हणजे आंब्याचा देठ. जर हापूस आंब्याच्या देठाकडील भागात खोल खड्डा असेल तर असा आंबा आतून खराब निघण्याची शक्यता असते.
खराब आंबा ओळखण्याची दुसरी टीप म्हणजे आंब्याचा देठ. जर हापूस आंब्याच्या देठाकडील भागात खोल खड्डा असेल तर असा आंबा आतून खराब निघण्याची शक्यता असते.
advertisement
4/5
 त्याच्याच उलट आतून चांगल्या आंब्याच्या देठाकडचा भाग हा किंचित खोलगट पण सरळ दिसेल असा असतो. तेव्हा  निवडताना त्याच्या देठाकडचा भाग किती खोलगट आहे हे नक्की तपासा.
त्याच्याच उलट आतून चांगल्या आंब्याच्या देठाकडचा भाग हा किंचित खोलगट पण सरळ दिसेल असा असतो. तेव्हा आंबा निवडताना त्याच्या देठाकडचा भाग किती खोलगट आहे हे नक्की तपासा.
advertisement
5/5
आंबा खरेदी करताना त्यावर कोणताही डाग नाही ना हे देखील तपासलं पाहिजे. काहीवेळा आंबे झाडावरून काढताना खाली पडतात, ज्यामुळे आंबा पिकायला सुरुवात झाल्यावर आतून खराब होऊ लागतो.
आंबा खरेदी करताना त्यावर कोणताही डाग नाही ना हे देखील तपासलं पाहिजे. काहीवेळा आंबे झाडावरून काढताना खाली पडतात, ज्यामुळे आंबा पिकायला सुरुवात झाल्यावर आतून खराब होऊ लागतो.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement