Uric Acid Problem in Winter: हिवाळ्यात होतोय युरिक ॲसिडचा त्रास, उपाशी पोटी प्या ‘हे’ ड्रिंक्स, पळून जाईल सांधेदुखी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Home Remedies for Uric Acid Problem in Marathi: हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. सांधेदुखीसाठी जुने आजार, हाडांची ठिसूळता, मुका मार अशी काही कारणं आहे. मात्र यामागचं प्रमुख कारण आहे ते युरिक ॲसिड. जर तुम्हालाही हिवाळ्यात युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर जाणून घेऊयात सकाळी उपाशी पोटी कोणते ड्रिंक्स घेतल्याने युरिक ॲसिडचा त्रास कमी होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी हळदीचं पाणी पिणं हे सुद्धा फायद्याचं ठरतं. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सूज कमी करण्यासाठी आणि युरिक ॲसिडच्या वेदनांपासून आराम देतात. सकाळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास हळदीचं पाणी प्यायल्याने विविध आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.
advertisement
advertisement
सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने पचन सुधारून गॅसेस अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. मात्र युरिक ॲसिडच्या त्रासावरही ओव्याचं पाणी हे फायद्याचं आहे. एका ग्लासमध्ये ओवा रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्याने फायदा होतो. जर तुम्हाला ओवा खाणं आवडत असेल तर हा भिजवलेला ओवा तुम्ही खाऊ शकता.
advertisement