3 शुभ योग एकाच दिवशी, अमावस्येला आयुष्यात उजेड पाडण्याची सुवर्णसंधी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
8 मे 2024 रोजी चैत्र अमावस्या आहे. ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी सांगितलं की, या अमावस्येला अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. विशेषत: शनी दोष, कालसर्प दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे.
advertisement
अमावस्येला सर्वार्थ सिद्धि योग, शोभन योग आणि सौभाग्य योग जुळून येणार आहेत. सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 01:35 वाजता सुरू होईल जो 9 मे रोजी सकाळी 05:30 वाजता संपेल. सौभाग्य योग 7 मेच्या रात्री 09:00 वाजता सुरू होईल आणि 8 मेच्या संध्याकाळी 05:40 वाजता संपेल. त्यानंतर शोभन योग सुरू होईल जो रात्रभर असेल.
advertisement
advertisement
advertisement
आपल्या परिसरात पिंपळाचं झाड असेल तर अमावस्येच्या दिवशी सकाळी या झाडाला पाणी देऊन दिवा लावा. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.
advertisement
तसंच कुंडलीतला कालसर्प दोष दूर करण्यासाठी या दिवशी मंदिरात जाऊन शिवलिंगावर असलेल्या सर्पाला अभिषेक करावा, त्याची विधीवत पूजा करावी. त्याचबरोबर नदीत तांब्याचा सर्प अर्पण केल्यासही कुंडलीतला कालसर्प दोष दूर होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)