advertisement

Ajit Pawar Plane Crash: वाईट झालं, लोक रडायला लागले; विमान क्रॅश घटनास्थळावरचं ह्रदयद्रावक दृश्य

Last Updated:

या व्हिडिओमधून ही घटना किती भीषण होती, हे पाहायला मिळतं. घटनास्थळी आगीचे लोट आणि लोकांची गर्दी दिसत आहेत.

अजित पवार विमान अपघात
अजित पवार विमान अपघात
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लॅण्डिंगआधी भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये हा अपघात झाला. घटनास्थळावरील काही व्हिडीओही समोर आले आहेत.
या व्हिडिओमधून ही घटना किती भीषण होती, हे पाहायला मिळतं. घटनास्थळी आगीचे लोट आणि लोकांची गर्दी दिसत आहेत. विमानाचा पूर्णपणे चुराडा झाला असून अवशेष विखुरलेले दिसत आहेत. या घटनेनंतर घटनास्थळीच लोकांनी मोठमोठ्याने रडत आक्रोश केला.
advertisement
अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डीसीजीएनं दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Plane Crash: वाईट झालं, लोक रडायला लागले; विमान क्रॅश घटनास्थळावरचं ह्रदयद्रावक दृश्य
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement