पुणे: आंतरजातीय विवाहातून हल्ला, दाजीला मारून बहिणीला उचलून नेणाऱ्या भावांना अटक, तरुणीचं काय झालं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबाने नवविवाहित दाम्पत्याला बेदम मारहाण करून मुलीचे अपहरण केले होते.
सचिन तोडकर, प्रतिनिधी राजगुरूनगर: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती घडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उच्चवर्णीय कुटुंबातील मुलीने भटक्या समाजातील मुलाशी प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबाने नवविवाहित दाम्पत्याला बेदम मारहाण करून मुलीचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईसह तिच्या दोन भावांना अटक केली आहे.
घटनेची माहिती अशी की, खेड तालुक्यातील २८ वर्षीय तरुणी प्राजक्ताने भटक्या समाजातील तरुण विश्वनाथ गोसावी याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तिच्या कुटुंबाला मान्य नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी नवदाम्पत्याला शोधून काढले आणि त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे जबरदस्तीने अपहरण केले.
या घटनेनंतर, पोलिसांनी तत्काळ दखल घेत मुलीच्या अपहरणासाठी व मारहाणीसाठी जबाबदार असलेल्या १५ जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मुलीची आई आणि दोन भावांचाही समावेश होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सोमवारी रात्रीच अपहरण झालेल्या प्राजक्ताला ताब्यात घेतले आणि तिला तिच्या पतीकडे सुपूर्द केलं.
advertisement
या प्रकरणी खेड पोलिसांनी आज मुलीची आई आणि तिच्या दोन भावांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुण्याच्या खेडमध्ये आंतरजातीय प्रेमविवाहातून तरुणाला जबर मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण pic.twitter.com/uHLQCxjiPe
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2025
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय जखमी तरुण विश्वनाथ गोसावी याचं प्राजक्ता नावाच्या एका २८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी इथं वैदिक पद्धतीने विवाह केला होता. पण हे लग्न मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हतं. याच कारणातून ३ ऑगस्ट रोजी विश्वनाथ यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये मुलीच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांचा समावेश होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 05, 2025 1:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे: आंतरजातीय विवाहातून हल्ला, दाजीला मारून बहिणीला उचलून नेणाऱ्या भावांना अटक, तरुणीचं काय झालं?