असा नवरा मिळायला खरंच भाग्य लागतं! मग बायकोलाही वाटेल सावित्री व्हावंसं...
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
सणासुदीला जसं महिला नटूनथटून वडाची पूजा करतात अगदी तसंच पुरुषांनीदेखील नवीन कपडे परिधान करून नीटनेटकेपणाने वडाला फेऱ्या मारल्या.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. पण हीच बायको पुढचे सात जन्म मिळावी, तिला दीर्घायुष्य लाभावं म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाहीत, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये काही सत्यवानांनी सावित्रीसाठी वडाची पूजा केली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिला.
पिंपरी-चिंचवड शहरातील मानवी हक्क संरक्षण जागर समिती गेल्या 9 वर्षांपासून पिंपळे गुरव परिसरात पुरुष, महिला असा कुठलाही भेदभाव न करता स्त्री-पुरुष समानता दाखवत पर्यावरणातील ऑक्सिजनचा स्रोत असलेल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी करतात. तब्बल 150 वर्षे जगणाऱ्या या वटवृक्षाप्रमाणे आपल्या बायकोची साथ आपल्याला मिळावी अशी त्यांची भावना आहे.
advertisement
जसं स्त्रियांना वाटतं की, हाच नवरा आपल्याला जन्मोजन्मी मिळावा तसंच पुरुषांनादेखील हीच बायको आपल्याला जन्मोजन्मी मिळावी असं का वाटू नये. याच भावनेतून ही वटपौर्णिमा साजरी करण्यात आल्याचं अण्णा जोगदंड यांनी सांगितलं. या सोहळ्यात काही महिलादेखील सहभागी झाल्या होत्या, पूजा कशी करावी याबाबत त्यांनी पुरुषांना मार्गदर्शन केलं.
advertisement
सणासुदीला जसं महिला नटूनथटून वडाची पूजा करतात अगदी तसंच पुरुषांनीदेखील नवीन कपडे परिधान करून नीटनेटकेपणाने वडाला फेऱ्या मारल्या. या आगळ्यावेगळ्या वटपौर्णिमेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर, 150 वर्षे जगणाऱ्या या वटवृक्षाप्रमाणे आपल्याला बायकोची साथ मिळावी अशी यामागची भावना असल्यामुळे सर्व महिलांनीही आपल्या नवरोबांचं कौतुक केलं. असा नवरा मिळाला तर कोणत्या बायकोला सावित्री व्हायला नाही आवडणार, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
June 21, 2024 6:08 PM IST