आईचे प्रेम तरुणाला बघवलं नाही, पुण्यात अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, प्रियकराचा तडफडून मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आईच्या प्रियकराला भयंकर मृत्यू दिला आहे.
सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आईच्या प्रियकराला भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपी तरुणाने आईच्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता, की आईचा प्रियकर जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत पावला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही धक्कादायक घटना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (१५ ऑगस्ट) दौंड शहरातील इंद्रानगर भागात डली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल थोरात नावाच्या तरुणाने आपल्या आईच्या अनैतिक संबंधांमुळे तिचा प्रियकर प्रवीण पवार याचा खून केला. विशाल याला आपल्या आईचे आणि प्रवीण पवारचे संबंध मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते.
advertisement
गुरुवारी सायंकाळी हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात विशालने प्रवीण पवार याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात, तोंडावर आणि हातावर झालेल्या या गंभीर हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
याप्रकरणी पोलिसांनी विशाल थोरात याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आईच्या अनैतिक संबंधांमुळे एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलून खून केल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे समाजात अनैतिक संबंधांचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Daund,Pune,Maharashtra
First Published :
August 15, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आईचे प्रेम तरुणाला बघवलं नाही, पुण्यात अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, प्रियकराचा तडफडून मृत्यू