पुणेकरांनो पाणी जपून वापरा, 'या' दिवशी बंद असेल पाणीपुरवठा!

Last Updated:

विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

बहुतांश भागात पाणी येणार नाही.
बहुतांश भागात पाणी येणार नाही.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : शहरातील विविध भागांमध्ये येत्या गुरुवारी म्हणजेच 4 जुलै 2024 रोजी पाणीपुरवठा बंद असेल. तर, त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाणी कमी दाबानं येईल. खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर आणि भामा आसखेड जॅक्वेल इथं विद्युत पंपिंगबाबत आणि स्थापत्यबाबत देखभाल दुरुस्तीची कामं गुरुवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
advertisement
शहरातील पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, इत्यादी जवळपास सर्व भागातला पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसंच पर्वती एमएलआर टाकी परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्चार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, इत्यादी भागातही पाणी नसेल.
संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी. टी. कवडेरोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हेडेवा-डीरोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु., इत्यादी भागातही पाणी येणार नाही.
advertisement
तसंच हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळक नगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, या भागातही पाणी येणार नाही.
advertisement
तर गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेजरोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत बाणेररोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतुश्रृंगी टाकीवरून पाणीपुरवठा होणारा बाधित भाग, पॉड रोड शीला विहार कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत टँकर पॉईंट डी.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकील नगर, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण या सर्व परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो पाणी जपून वापरा, 'या' दिवशी बंद असेल पाणीपुरवठा!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement