Pune Crime : निलेश घायवळ स्विझर्लँडला पळाला, पुणे पोलिसांनी केले रिटर्न येण्याचे वांदे, 38 लाखांचा फटका!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime News : नीलेश घायवळ याच्या पासपोर्टबाबत पोलिसांनी पुणे पासपोर्ट विभागाकडे माहिती मागितली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही.
Pune police Action On Nilesh ghaywal : पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याने कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर परदेशात पळ काढला. निलेश घायवळ सध्या स्विझरलँडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी घायवळचे रिटर्न येण्याचे वांदे केले आहेत. निलेश घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या मालकीच्या एका व्यावसायिक आस्थापनेची मिळून विविध बँकांतील दहा खाती पोलिसांनी गोठवल्याची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळच्या या दहा खात्यात मिळून एकूण 38 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.
दहा बँक खाती गोठवली
गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, त्यातूनच हे पाऊल उचलण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण दहा बँक खाती गोठवण्यात आली. त्यामध्ये एकूण 38 लाख 26 हजार रुपये जमा आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली.
advertisement
घायवळ सध्या परदेशात
पुढील तपासामध्ये या गुन्ह्याशी संबंधित अधिक आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपीचा तपशीलही उघड होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. घायवळ सध्या परदेशात असल्याचे पोलिसांनी सांगितलं. परंतु, इतर आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सखोलपणे चालू आहे.
10 जणांवर मकोका
advertisement
कोथरूड परिसरात अलीकडेच घायवळ टोळीतील गुंडांनी दोन व्यक्तींवर हिंसक हल्ला केल्याची घटना पडली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये कट आढळल्पाच्या आरोपाखाली टोळीप्रमुख नीलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले असून, एकूण दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई सुरू आहे.
advertisement
माहिती मिळण्यास विलंब का?
नीलेश घायवळ याच्या पासपोर्टबाबत पोलिसांनी पुणे पासपोर्ट विभागाकडे माहिती मागितली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही. ही माहिती मिळण्यास विलंब का लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घायवळकडे किती पासपोर्ट आहेत, याची माहिती देखील पोलिसांना मिळू शकलेली नाही, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
तक्रार देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांची
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिसांनी घेतला असून, त्यानुसार कठोर पावले उचलली जात आहेत. या गँगस्टरविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. आंदेकर टोळीविरोधात खंडणीची तक्रार देणाऱ्यांसह अन्य तक्रारदारांना सुरक्षा पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 01, 2025 11:03 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : निलेश घायवळ स्विझर्लँडला पळाला, पुणे पोलिसांनी केले रिटर्न येण्याचे वांदे, 38 लाखांचा फटका!