Video: माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट; 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर
- Published by:Ramesh Patil
- Written by:Virendrasigh Utpat
Last Updated:
Pandharpur Maghi Ekadashi Puja: विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार, सभामंडप आदी ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीने देवाचे रूप अधिक खुलल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर (सोलापूर) : माघ शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशीच्या निमित्ताने आज पंढरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब, कॉनवर अशा विविध देशी-विदेशी 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार, सभामंडप आदी ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीने देवाचे रूप खुलले आहे.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचं व्रत साजरं केलं जातं. त्या दिवशी उपवास करून लोक भगवान विष्णू, पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करतात. जया एकादशी व्रताची कथा पद्मपुराणात सांगितली आहे, ज्यात त्याचे महत्त्वही सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णांने युधिष्ठिराला सांगितले होते की, जया एकादशीचं व्रत केल्यानं माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. एवढेच नाही तर त्या आत्म्याला भूत, पिशाच इत्यादींपासून मुक्ती मिळते. जया एकादशीचं व्रत केल्यानं ब्रह्मदेवाच्या हत्येचे पापही नष्ट होऊ शकते.
advertisement
माघ शुद्ध एकादशी निमित्तने विठ्ठल मंदिरात विविध फुलांची सजावट #pandharpur #marathinews pic.twitter.com/NcCzlkMjjl
— News18Lokmat (@News18lokmat) February 20, 2024
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी माघ शुक्ल एकादशी तिथी सोमवार, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:40 वाजता सुरू होईल आणि ही तिथी मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:55 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे एकादशी मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी आहे.
advertisement
जया एकादशी 2024 पूजा मुहूर्त -
जया एकादशीच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून भगवान विष्णूची उपासना करू शकता. त्यावेळी प्रीति योग आणि रवि योग असेल. हा काळ शुभ मानला जातो. त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:14 ते 06:05 पर्यंत असेल, तर अभिजीत मुहूर्त दुपारी 12:12 ते 12:58 पर्यंत आहे. हा त्या दिवसाचा सर्वात शुभ मुहूर्त असेल.
advertisement
जया एकादशी 4 शुभ योगांमध्ये -
जया एकादशी व्रताच्या दिवशी 4 शुभ योग तयार होतील. व्रताच्या दिवशी रवि योग, त्रिपुष्कर योग, प्रीति योग आणि आयुष्मान योग असतील. जया एकादशीला प्रीति योग सकाळपासून 11:46 पर्यंत चालेल, त्यानंतर आयुष्मान योग तयार होईल, जो संपूर्ण रात्रभर राहील.
advertisement
रवि योग त्या दिवशी सकाळी 06:56 ते दुपारी 12:13 पर्यंत असेल, तर त्रिपुष्कर योग दुपारी 12:13 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:55 पर्यंत असेल. व्रताच्या दिवशी आर्द्रा नक्षत्र सकाळपासून दुपारी 12.13 पर्यंत असते, त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र असेल.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
February 20, 2024 8:10 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Video: माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट; 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर


