Buddha Purnima 2024 : असा आहे बुद्ध जयंतीचा इतिहास, तुम्हालाही देईल प्रेरणा, अनोखी गोष्ट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आज ही बुद्ध पौर्णिमा 23 मे 2024 रोजी आहे. बौद्ध धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो.
सोनाली भाटी, प्रतिनिधी
जालौर : आज बुद्ध पौर्णिमा आहे. या बुद्ध पौर्मिणेच्या दिवशी बुद्ध जयंती साजरी केली जाते. हा सण गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानोदय आणि मृत्यूचा प्रतीक आहे. या सणाचे विशेष महत्त्व आहे आणि अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
बुद्ध पौर्णिमा काय आहे?
बुद्ध पौर्णिमा बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण दक्षिण, दक्षिण पूर्व आणि पूर्व आशिया खंडात साजरा केला जातो. या दिवशी राजकुमार सिद्धार्थ गौतम जे नंतर गौतम बुद्धाच्या नावाने ओळखले आणि ज्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, यांचे स्मरण केले जाते. बौद्ध परंपरा आणि पुरातत्व शोधानुसार, गौतम बुद्ध यांचा जन्म लुम्बिनी, नेपाळ येथे सुमारे 563-483 इसवी सन पूर्व झाला होता.
advertisement
जूनमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन, या तीन राशींच्या लोकांचं होणार नुकसान, आताच व्हा सावध!
त्यांची आई राणी माया देवी यांनी आपल्या पूर्वजांच्या घरी असताना गौतम बुद्ध यांना जन्म दिला. त्यांचे वडील राजा शुद्धोधन होते. माया देवी मंदिर, त्याच्या आजूबाजूचा बगिचा आणि 249 इसवी सन पूर्वच्या अशोक स्तंभासोबत, लुम्बिनी येथे बुद्धाचे जन्मस्थान चिन्हांकित करते.
advertisement
बुद्धाच्या जन्मदिनाचा उत्सव सामान्यत: पश्चिमी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, एप्रिल किंवा मे महिन्यात साजरा केला जातो. यामध्ये लीप वर्षात बदल होतो. आज ही बुद्ध पौर्णिमा 23 मे 2024 रोजी आहे. बौद्ध धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व -
बुद्ध पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे. कारण हा बुद्धांच्या जीवनाचे स्मरण कतो. त्यांनी दिलेल्या शिकवणीचा आनंद साजरा करतो. सांस्कृतिक ऐक्याला प्रोत्साहन देते आणि आधुनिक काळात त्याच्या शिकवणींची प्रासंगिकता प्रमुखतेने समोर आणते. बुद्ध पूर्णिमा बुद्धांच्या आयुष्याच्या आठवणीत जगभरातील बौद्धांद्वारे साजरी केली जाते.
advertisement
स्वप्नात स्वत:चे किंवा मित्र-मैत्रिणीचे लग्न झालेले पाहणे शुभ कि अशुभ? जाणून घ्या, यामागचे महत्त्वाचे संकेत
बुद्धांच्या शिकवणीने जगावर मोठा प्रभाव पाडला. बुद्ध पौर्णिमेचा सण हा तीनदा धन्य सण अशा स्वरूपातही साजरा केला जातो, कारण हा सण बुद्धाच्या जीवनातील तीन मुख्य, म्हणजे त्यांचा जन्म, ज्ञानोदय आणि निर्वाण या घटना साजरा करतो.
advertisement
या घटना बुद्धाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आहेत. बुद्धाच्या ज्ञान, एकाग्रता आणि शिस्त या संबंधातील तत्त्वज्ञान आधुनिक काळातही प्रासंगिक आहेत. तसेच हे सर्व तत्त्वज्ञानावर चिंतन करण्याची आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्या कशा लागू केल्या जाऊ शकतात यावर विचार करण्याची संधी हा सण देतो.
Location :
Rajasthan
First Published :
May 23, 2024 8:36 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Buddha Purnima 2024 : असा आहे बुद्ध जयंतीचा इतिहास, तुम्हालाही देईल प्रेरणा, अनोखी गोष्ट