फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा उजाडतोय! काही राशींना मिळणार आनंद, काहींनी मात्र सावध राहावं

Last Updated:

काही राशींच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात जमीन किंवा घर खरेदीचा योग आहे. तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र शत्रूंकडून अडचणींचा सामना करावा लागेल.

हा आठवडा प्रत्येकासाठी वेगळा असणार हे नक्की.
हा आठवडा प्रत्येकासाठी वेगळा असणार हे नक्की.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : आता कुठे वर्षाची सुरुवात झाली होती आणि आता वर्षाचा दुसरा महिना संपायलासुद्धा आला. उद्या उजाडणारा फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा प्रत्येकासाठी वेगळा असणार हे नक्की. खरंतर आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय, हे आपल्या कुंडलीतल्या ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे राशींनुसार पाहूया हा आठवडा कोणासाठी कसा असणार.
झारखंडच्या देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते सांगतात, काही राशींच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात जमीन किंवा घर खरेदीचा योग आहे. तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र शत्रूंकडून अडचणींचा सामना करावा लागेल. ज्योतिषी नेमकं काय म्हणाले सविस्तरपणे जाणून घेऊया.
advertisement
मेष : आपल्यासाठी हा आठवडा शुभ असेल. आपण नवं काम सुरू करू शकता. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळेल.
वृषभ : फेब्रुवारी खडतर गेला असला तरी शेवटचा आठवडा मात्र शुभ असेल. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता पूर्ण होतील. नोकरीत कौतुक होईल. बढतीही मिळू शकते. आपली आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे.
advertisement
मिथुन : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक असेल. शत्रू आपल्यावर भारी पडतील. प्रत्येक कामात अडचणी येतील. कामामध्ये आळस अजिबात येऊ देऊ नका, नाहीतर सारंकाही बिघडेल. आर्थिक स्थितीही कोलमडेल. त्यामुळे खर्च जरा जपून करा.
कर्क : आपल्या कुटुंबात या आठवड्यात अत्यंत आनंदाचं वातावरण असेल. वडिलांच्या सहकार्याने थांबलेली सर्व कामं मार्गी लागतील. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. वाहनखरेदीचा योग आहे. आरोग्य उत्तम साथ देईल. एकूणच हा आठवडा आपल्यासाठी शुभ आहे.
advertisement
सिंह : आपल्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे. ठरवलेली सर्व कामं पूर्ण होतील. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी परिस्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. ताण-तणावही कमी होईल.
कन्या : आपल्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे, मात्र कोणतंही कार्य विचारपूर्वक करावं नाहीतर पश्चात्ताप करावा लागेल. गुंतवणूक करताना सावधान, त्यातून नुकसान होऊ शकतं. कोणालाही पैसे उधार देऊ नये. नाहीतर स्वतःच्याच पैशांसाठी भीक मागावी लागेल. जोडीदारासोबत खटके उडू शकतात.
advertisement
तूळ : आपल्यासाठी हा आठवडा चांगला आहे. प्रवास होऊ शकतो. करियरमध्ये प्रगती होईल. नोकरीचा शोध आता संपेल. शिवाय वैवाहिक जीवनात सुख येईल.
वृश्चिक : आपल्याला या आठवड्यात आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. त्यामुळे सावध राहा. त्याचा थेट परिणाम आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.
धनू : आपल्यासाठी हा आठवडा प्रसन्न असणार आहे. व्यवसायात प्रगती होईल, करियरमध्ये यश मिळेल. कामानिमित्त चांगला प्रवास होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.
advertisement
मकर : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक आहे. मन अस्वस्थ राहील. कुटुंबातील एका सदस्याची प्रकृती खालावेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण होईल. मालमत्तेबाबत व्यवहार करताना जरा जपून.
कुंभ : आपण ठरवलेली कामं या आठवड्यात पूर्ण होतील. परंतु अचानक एखादी जबाबदारी खांद्यावर पडू शकते. धावपळ होईल. शत्रू निर्माण होतील. परंतु अखेर आपले चांगले दिवस सुरू होतील.
advertisement
मीन : आपल्यासाठी हा आठवडा चांगला आहे. घरात शुभ कार्य पार पडेल. पालकांना मुलांबाबत शुभवार्ता कळतील. एकूणच आनंदी वातावरण असेल. करियरमध्ये प्रगती होईल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे बचत होईल. वडिलांची साथ मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/अध्यात्म/
फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा उजाडतोय! काही राशींना मिळणार आनंद, काहींनी मात्र सावध राहावं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement