IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्याच सामन्यात, 579 कोटी रुपयांच्या जर्सीमध्ये मैदानात उतरली टीम इंडिया
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे, परंतु टीम इंडियाची नवीन जर्सी क्रिकेटपेक्षा जास्त लक्ष वेधून घेत आहे.
IND vs WI 1st Test : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे, परंतु टीम इंडियाची नवीन जर्सी क्रिकेटपेक्षा जास्त लक्ष वेधून घेत आहे. कारण स्पष्ट आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ₹579 कोटींच्या मोठ्या करारानंतर अपोलो टायर्सला त्यांचे नवीन जर्सी प्रायोजक म्हणून करारबद्ध केले आहे. भारतीय खेळाडू मैदानात उतरताच, सर्वांचे लक्ष त्यांच्या छातीवर कोरलेल्या अपोलो टायर्सच्या लोगोवर खिळले.
ड्रीम-11 नंतर नवीन स्पॉन्सरशिप
पूर्वी, ड्रीम 11भारतीय संघाचे जर्सी स्पॉन्सर होते, परंतु अलिकडेच देशात फॅन्टसी बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्यात आल्याने, ड्रीम11 ला करार अर्ध्यावरच सोडावा लागला. त्यानंतर, अपोलो टायर्सने बीसीसीआयला मार्च 2028 पर्यंत एक मोठा करार ऑफर केला, जो बोर्डाने लगेच स्वीकारला. परिणामी, भारतीय जर्सीवरील अपोलो टायर्स ब्रँडिंग पुढील अडीच वर्षांसाठी संघाची नवीन ओळख असेल. या करारानुसार अपोलो टायर्स कंपनी संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करणार आहे. हे रक्कम मागील स्पॉन्सर ड्रीम11 ने दिलेल्या 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
advertisement
Team India's new title sponsor, Apollo Tyres, featuring on the jersey! 🇮🇳🤍👕#ShubmanGill #India #Tests #Sportskeeda pic.twitter.com/NmbeuKEN7o
— Sportskeeda (@Sportskeeda) October 2, 2025
अहमदाबाद कसोटी नाणेफेक आणि संघ
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, टीम इंडिया दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंच्या संतुलित संयोजनासह खेळेल. या सामन्यासाठी नितीश कुमार रेड्डी यांनाही संघात परत घेण्यात आले आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. शिवाय या सामन्याची सुरुवात वेस्ट इंडिजसाठी खास चांगली झाली नाही 40.3 ओव्हर्समध्ये 155/9 विकेट त्यांना गमवावे लागले आहेत. तर याउलट भारतीय संघाने टॉस गमावूनसुद्धा सामन्यात वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
advertisement
दिग्गजांशिवाय एक नवीन सुरुवात
हा सामना विशेष आहे कारण हा भारताचा घरच्या मैदानावर पहिलाच कसोटी सामना आहे, ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश नाही. या तिघांच्या निवृत्तीनंतर, टीम इंडियाने एका नवीन युगात प्रवेश केला आहे. अहमदाबाद कसोटी तरुण खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची एक महत्त्वाची संधी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 2:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्याच सामन्यात, 579 कोटी रुपयांच्या जर्सीमध्ये मैदानात उतरली टीम इंडिया