विराट RCB सोडणार का IPL? करारावर सही करायला कोहलीचा नकार, कॉन्ट्रॅक्ट रिन्यूवल वादाची Inside Story
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराटच्या आयपीएलच्या भविष्याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. विराटने आयपीएल 2026 आधी आरसीबीसोबत करार करायला नकार दिल्याचं वृत्त आहे, त्यामुळे विराटच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू विराट कोहलीच्या भविष्याबाबतचा सस्पेन्स काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. 2027 चा वनडे वर्ल्ड कप विराट खेळेल का नाही? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत, त्यातच आता विराटच्या आयपीएलच्या भविष्याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. विराटने आयपीएल 2026 आधी आरसीबीसोबत करार करायला नकार दिल्याचं वृत्त आहे, त्यामुळे विराटच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कराराबद्दलचा गोंधळ का?
रेव्हस्पोर्ट्झचे रिपोर्टर रोहित जुगलान यांनी एका व्हिडिओमध्ये खुलासा केला की विराट कोहलीला नवीन आयपीएल हंगामापूर्वी व्यावसायिक कराराचे नूतनीकरण करायचे होते. हा करार त्याच्या आयपीएल सहभागाशी संबंधित नव्हता, तर त्याच्या फ्रँचायझी आरसीबीशी संबंधित होता. अशा परिस्थितीत, जर विराटने स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या भविष्यातील आयपीएल सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते.
advertisement
करारावर स्वाक्षरी न केल्यामुळे विराट आरसीबीसोबतचं त्याचं नातं संपवत आहे का? का विराट आयपीएलमधूनच निवृत्त होत आहे? सध्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं फक्त विराट कोहलीलाच माहिती आहेत, पण या कॉन्ट्रॅक्टवरून नेमका काय वाद आहे? याचं उत्तर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर तनय तिवारीने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
दुसऱ्या टीममध्ये जायचा प्रश्नच नाही
advertisement
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या मुद्द्यावर चर्चा केली. 'व्यावसायिक करार पुन्हा स्वाक्षरी न केल्याने कोहली आयपीएलमध्ये खेळणार नाही असा अर्थ होत नाही. हा करार खेळाडूच्या खेळण्याच्या करारापेक्षा वेगळा आहे. हा 'दुहेरी करार' असू शकतो, जो कोहली वाढवू इच्छित नाही', असं आकाश चोप्रा म्हणाला. तसंच आपण जोपर्यंत आयपीएल खेळू ती आरसीबीकडूनच खेळू, असं विराटने याआधीच स्पष्ट केलं आहे, याची आठवणही आकाश चोप्राने करून दिली.
advertisement
स्पॉन्सर-फ्रँचायजीच्या डीलमध्ये खेळाडू
दुसरीकडे तनय तिवारीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्याने व्यावसायिक कराराचा अर्थ स्पष्ट केला. 'व्यावसायिक करारांतर्गत, जेव्हा एखादी फ्रँचायजी एखाद्या कंपनीसोबत स्पॉन्सरशीप करारावर स्वाक्षरी करते तेव्हा त्यात हे देखील समाविष्ट असते की टीमचे खेळाडू त्या कंपनीच्या जाहिराती आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. या प्रकारचा करार प्रत्येक खेळाडूसोबत केला जातो.
advertisement
कोहलीचे प्रकरण असेच दिसते. उदाहरणार्थ, प्यूमा आरसीबीच्या जर्सी बनवते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत, कोहली या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे, त्याने फ्रँचायजीसोबत या कंपनीच्या जाहिरातींमध्येही भाग घेतला. पण आता तो दुसऱ्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला आहे, तर आरसीबीचा करार अजूनही पुमासोबत आहे. अशा परिस्थितीत, कोहली या कंपनीसोबतचा करार नूतनीकरण करण्यास नकार देऊ शकतो. कदाचित कोहलीने अशाच प्रकारच्या व्यावसायिक करारावर पुन्हा स्वाक्षरी करण्यास नकार दिला असेल आणि म्हणूनच, या कराराचा विराटच्या आयपीएल सहभागाशी काहीही संबध नसेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 11:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराट RCB सोडणार का IPL? करारावर सही करायला कोहलीचा नकार, कॉन्ट्रॅक्ट रिन्यूवल वादाची Inside Story