KBC Junior : ईशित भट्टसारखीच झाली होती या मुलाची हालत, ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गमावले तब्बल 4700000
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
KBC Junior : ईशित भट्टप्रमाणेच दोन वर्षांपूर्वी ८ वर्षांच्या एका मुलाने त्याच्या अतिआत्मविश्वासामुळे तब्बल ४७ लाख रुपये गमावले होते आणि तेव्हाही अमिताभ बच्चन निराश झाले होते.
मुंबई: 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) मध्ये नुकताच पाचवीतील ईशित भट्ट या चिमुकल्या स्पर्धकाचा अतिआत्मविश्वास आणि होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी केलेले 'रूड' वर्तन चर्चेचा विषय बनले आहे.
advertisement
अतिआत्मविश्वासाच्या भरात त्याने सगळी कमाई गमावली आणि त्याला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. मात्र, ही अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी, दोन वर्षांपूर्वी ८ वर्षांच्या एका मुलाने याच अतिआत्मविश्वासामुळे तब्बल ४७ लाख रुपये गमावले होते आणि तेव्हाही अमिताभ बच्चन निराश झाले होते.
advertisement
साल २०२३ मध्ये 'कौन बनेगा करोडपती १५' च्या एका एपिसोडमध्ये विराट अय्यर नावाचा ८ वर्षांचा मुलगा हॉट सीटवर बसला होता. शाळेत त्याला सगळे 'गुगल बॉय' म्हणायचे. त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खेळात पटापट प्रश्नांची उत्तरे दिली आणि हा टॅग खरा ठरवला.
advertisement
परंतु, जेव्हा तो १ कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला, तेव्हा त्याचा हाच अतिआत्मविश्वास त्याला आणि त्याच्या पालकांना मोठा धक्का देऊन गेला. जर त्याने प्रश्न सोडला असता, तर त्याला ५० लाख रुपये मिळाले असते, पण त्याला खात्री होती की त्याचे उत्तर बरोबर आहे.
advertisement
विराट अय्यरला अमिताभ बच्चन यांनी १ कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारला होता: "पीरियॉडिक टेबलमध्ये ९६ आणि १०९ अणुसंख्या असलेल्या दोन घटकांच्या नावांमध्ये कोणती गोष्ट विशेष आहे?" पर्याय होते: (अ) नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावावर आहेत, (ब) महिला शास्त्रज्ञांच्या नावावर आहेत, (क) भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर आहेत, (ड) त्यांची कोणतीही नावे नाहीत.
advertisement
विराटकडे कोणतीही लाइफलाइन शिल्लक नव्हती. त्याने आत्मविश्वासाने पर्याय (अ) नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावावर निवडला, पण योग्य उत्तर होते (ब) महिला शास्त्रज्ञांच्या नावावर.
advertisement
चुकीचे उत्तर दिल्याने विराट अय्यरची कमाई थेट ३ लाख २० हजार रुपयांवर आली. तो १ कोटी रुपये जिंकण्यापासून फक्त एका प्रश्नाने दूर राहिला आणि त्याला तब्बल ४७ लाख रुपये गमवावे लागले. त्याचे आई-वडीलही खूप निराश झाले.
advertisement