एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा, महायुतीत पडला मिठाचा खडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची थेट घोषणा करून टाकली आहे. या घोषणेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
Jalgaon News : विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : आगामी स्वराज्य स्वस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याची शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची थेट घोषणा करून टाकली आहे. या घोषणेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आमदार किशोर पाटील यांनी यावेळी भाजपवर थेट आरोप करत म्हटले की, “दोन टर्मपासून विरोधक गुपचूप किंवा थेट उमेदवार देत मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत.भाजपाच्या काही नेत्यांनी पाठीत खंजीर खूप असणार असाल तर, “अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा समोरासमोर लढणं कधीही बरे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात युती होणार नाही आणि शिवसेना एकहाती निवडणूक लढेल,असे किशोर पाटील यांनी जाहिर केले आहे.
advertisement
भडगाव नगरपालिकेसाठी रेखा मालचे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली असून, पाचोरा नगरपालिकेसाठीची उमेदवारी 1 नोव्हेंबर रोजी जनतेच्या कौलावरून जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान राज्यातील अनेक भागांत महायुतीचे नेते एकत्रित निवडणुकांची तयारी करत असताना, आमदार किशोर पाटील यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
निवडणूकीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
advertisement
आम्ही सगळ्यांना सांगितले आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत. अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल. मात्र जिथे युती होऊ शकणार नाही, त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणी टीका करणार नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केले आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
October 13, 2025 11:33 PM IST