Dream11: 39 रुपयांचे झाले 2 कोटी 44 लाख, मंगललाही विश्वास बसेना; बापाच्याही डोळ्यात आलं पाणी

Last Updated:

बघता बघता गावात मंगल करोडपती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोक आणि नातेवाईकांनी मंगलला खांद्यावर उचून एकच जल्लोष केला.

News18
News18
कधी कुणाचं नशीब कसं बदलेले हे कुणीच सांगू शकत नाही. झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक तरुण हे ड्रीम ११ आणि माय ११ सर्कल सारख्या एपवर नशीब आजमावत असतात. अनेक जणांना जॅकपॉट लागतो तर काही जणांच्या पदरी मात्र निराशा येतेय. मॅचवर लावलेले 39, 49 रुपये मिळाले तरी बसं झालं. पण, एका प्लायवूड कंपनीत काम करणारा तरुण हा ३९ रुपयांमध्ये ४ कोटींचा मालक झाला.  ४ कोटी रुपये जिंकणाऱ्या मंगलचा व्हिडीओ आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यात राहणाऱ्या मंगल सरोज हा तरुण आता करोडपती झाला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण, त्याच्यासोबत घडलेली घटना ही आयपीएल २०२५ च्या सीझनमधली आहे. मंगलने आयपीएलमधील एका मॅचवर ३९ रुपयांमध्ये टीम लावली होती. एपमध्ये टीम लावून तो रात्री झोपी केला. पण जेव्हा सकाळी उठला तेव्हा पाहिलं तर ४ कोटी रुपये जिंकला असल्याचं लक्षात आलं. आपण, करोडपती झालोय हे पाहून त्याला विश्वास बसला नाही. पण जेव्हा एपमध्ये नीट तपासणी केली असता त्याचा आनंदाचा पारावारा उरला नाही.
advertisement
बघता बघता गावात मंगल करोडपती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोक आणि नातेवाईकांनी मंगलला खांद्यावर उचून एकच जल्लोष केला. मंगल हा एका प्लायवूड तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होता. आता जिंकलेल्या पैशातून मंगलने आपली स्वत:चा बिझनेस सुरू केला आहे.
advertisement
त्या रात्री असं काय घडलं?
एप्रिल २०२५ मध्ये आयपीएलचे सामने सुरू झाले होते. मंगल हा अनेक वर्षांपासून फॅन्टसी एपवर करोडपती होण्याचं स्वप्न पाहून टीम लावत होता. मार्च महिन्यापासून 49 रुपये गुंतवून 'ड्रीम 11' वर टीम लावायचा. पण प्रत्येक गेममध्ये त्यांचा पराभव व्हायचा. पण 30 एप्रिल रोजी चेन्नई आणि पंजाब मॅच होती. मंगलच्या खात्यात फक्त 39 रुपये शिल्लक होते. तरीही त्याने हार मानली नाही चेन्नई आणि पंजाबच्या मॅचवर एक टीम तयार केली. रात्री उशीर झाल्यामुळे तो झोपी गेला. सकाळी उठून पाहिलं तर मंगलची टीम जिंकली होती. त्याने ४ कोटी रुपये जिंकले होते. विशेष म्हणजे, त्याने आतापर्यंत 77 वेळा मॅच लावली, पण हातात काहीच आलं नाही. 78 व्या वेळी 29 एप्रिल रोजी मंगलने उरलेल्या 39 रुपयांमध्ये शेवटचा एक चान्स म्हणून एकच टीम लावली आणि जिंकला.
advertisement
मंगल सरोज याचे वडील सुखलाल सरोज हे शेतकरी आहेत. ते दुसऱ्यांच्या शेतीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतात जे काही पीक घेतले जाते, त्यातील एक तृतीयांश ते शेतमालकाला देतात आणि उरलेले कुटुंबासाठी ठेवतात.
४ कोटी जिंकले पण हातात आले २ कोटी!
मंगल सरोजने ४ कोटी रुपये जिंकले असले तरी त्याच्या हातात पूर्ण रक्कम आली नाही. Dream11 वर जिंकलेल्या रक्कमेवर आयकर अधिनियम, 1961 कलम 56(2)(ib) नुसार अतिरिक्त कमाईनुसार टॅक्स लागेल. ४ कोटी जिंकलेली रक्कम यावर ३० टक्के कर लागला. सरचार्ज आणि सेस मिळून एकूण ३९ टक्के इतका टॅक्स लागतो. Dream11 कडून टीडीएस कपात 1.56 कोटी वजा झाले. त्यामुळे मंगलच्या हातात 2.44 कोटी रुपये आले. ड्रीम ११ वर १० हजारांपेक्षा जास्त जिंकले तर टीडीएल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मंगलसला आधी टॅक्स भरावा लागला. तसंच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करत असताना ४ कोटी रुपये रक्कम दाखवावी लागेल. Form 26AS मध्ये टीडीएस दाखवावा लागेल की जेणेकरून Dream11 कडून टीडीएस कपात केलं आणि टॅक्स क्रेडिट स्टेटमेंटमध्ये कोणताही फरक नाही हे दाखवावं लागेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Dream11: 39 रुपयांचे झाले 2 कोटी 44 लाख, मंगललाही विश्वास बसेना; बापाच्याही डोळ्यात आलं पाणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement