पावसाळ्यात का फुगतात लाकडी दरवाजे? बंद होत नसतील तर 'या' टीप्स ठरतील उपयोगी

Last Updated:

पावसाळ्यात घरातील लाकडी दरवाजे आणि खिडक्या या फुगतात ज्यामुळे ते घट्ट बसतात किंवा कधीकधी नीट बसत नाहीत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : उन्हाळ्याला लोक कंटाळले की ते पावसाची वाट पाहातात. पावसामुळे सगळीकडे थंडावा पसरतो, वातावरण एकदम गुलाबी होतं आणि सर्वत्र हिरवळ पसरल्यामुळे मन अगदी उत्साही होतं. लोक बाहेर फिरायला देखील जातात. पण या सगळ्यात लोकांना पावसामुळे होणाऱ्या इतर त्रासाला सामोरं जावं लागतं.
पावसाळ्यात घरातील लाकडी दरवाजे आणि खिडक्या या फुगतात ज्यामुळे ते घट्ट बसतात किंवा कधीकधी नीट बसत नाहीत. खरंतर हे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे होतं. पावसाळ्यात लाकूड हवेतील पाणी शोषून घेतं आणि मग फुगतं, ज्यामुळे दरवाजे नीट बंद होत नाहीत. ही अडचण विशेषतः जुन्या घरांमध्ये किंवा जिथे लाकडाला योग्यप्रकारे सीझनिंग किंवा पॉलिश केलेले नसते तिथे जास्त दिसून येते.
advertisement
पण आता प्रश्न असा उभा रहातो की असं काय होतं की पावसात दरवाजे फुगतात?
लाकूड हे नैसर्गिक गोष्ट आहे, जे हवेतल्या आर्द्रतेला सहज शोषते. पावसाळ्यात हवेतील ओलावा खूप वाढतो, त्यामुळे लाकडाचे रेशे पसरतात. परिणामी दरवाजा जाडसर होऊन चौकटीत फिट बसत नाही.
मग अशात करायचं काय?
दरवाजा उन्हात वाळवा – शक्य असल्यास दरवाजा चौकटीतून काढून उन्हात ठेवा. त्यामुळे लाकूड परत आकसते आणि फिट बसू शकते.
advertisement
सॅंडपेपरने घासणे – जिथे दरवाजा अडकतो, तिथे सॅंडपेपरने हलके घासावे. मात्र जास्त घासल्यास हिवाळ्यात फटी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जास्त घासू नका.
टॅलकम पावडर किंवा वॅक्स – चौकटीच्या अडकणाऱ्या भागावर टॅलकम पावडर किंवा वॅक्स लावल्यास घर्षण कमी होऊन दरवाजा सहज बंद होईल.
स्क्रू अ‍ॅडजस्टमेंट – काहीवेळा हिंज सैल होऊन दरवाजा झुकतो. अशावेळी स्क्रू घट्ट करणे किंवा हिंजची पोजिशन बदलणे फायदेशीर ठरते.
advertisement
आता हे तर झाले तात्पुरते उपाय. पण दरवाजासोबत असं होऊ नये यामुळे परमनंट सॉल्यूशन काय?
लाकडाचे सीझनिंग आणि पॉलिश : नवीन दरवाजे बसवताना त्यांचे सीझनिंग करून पॉलिश किंवा वॉर्निशची लेयर लावावी, जेणेकरून हवेतील ओलावा कमी शोषला जाईल.
वॉटरप्रूफ कोटिंग : दरवाज्यावर वॉटरप्रूफ पेंट किंवा सीलंट लावल्याने पाणी आणि आर्द्रतेचा परिणाम कमी होतो.
advertisement
PVC किंवा मेटल दरवाजांचा पर्याय : जर दरवर्षी ही समस्या होत असेल तर पावसाचा जास्त परिणाम होणाऱ्या भागात PVC, अॅल्युमिनियम किंवा मेटल दरवाजांचा वापर करावा.
पावसाळ्यात लाकडी दरवाजांचे फुगणे ही एक सामान्य समस्या आहे, पण योग्य वेळी काळजी आणि दुरुस्तीद्वारे ती सहज टाळता येते. तात्पुरते उपाय त्वरित दिलासा देतात, तर सीझनिंग, पॉलिश आणि वॉटरप्रूफिंगसारखे दीर्घकालीन उपाय दरवाज्यांना अनेक वर्षे सुंदर आणि मजबूत ठेवतात.
मराठी बातम्या/Viral/
पावसाळ्यात का फुगतात लाकडी दरवाजे? बंद होत नसतील तर 'या' टीप्स ठरतील उपयोगी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement