पृथ्वीवर महाभयंकर संकट, नानकाई ट्रफमध्ये 'टेक्टोनिक टाईम बॉम्ब'चा धोका; एका क्षणात 2.98 लाख मृत्युमुखी पडण्याची भीती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Earthquake: वैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार कधीही 9 रिक्टर स्केलचा महाभूकंप येऊ शकतो. ज्यामुळे भीषण त्सुनामी, लाखोंचा मृत्यू आणि अब्जावधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
टोकियो: जपान सरकारने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर मोठ्या भूकंपाचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य महाभूकंप 9 रिश्टर स्केलपर्यंत तीव्र असू शकतो आणि त्यामुळे विध्वंसक त्सुनामी, शेकडो इमारतींचे पतन आणि सुमारे 3 लाख लोकांचे बळी जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पहिल्यांदाच महाभूकंपाचा अधिकृत इशारा
मागील वर्षी जपानने प्रथमच महाभूकंपाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यात नानकाई ट्रोफमध्ये 9 रिश्टर स्केलपर्यंत भूकंप होण्याची शक्यता जाहीर करण्यात आली होती. यापूर्वी या प्रदेशात 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला होता. ज्यामुळे सरकारने अधिक सतर्क राहण्याचा निर्णय घेतला.
अर्थव्यवस्थेला मोठा फटका
‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने मिळवलेल्या सरकारच्या अहवालानुसार, हा भूकंप झाल्यास जपानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अंदाजानुसार तब्बल १.८१ ट्रिलियन डॉलर्स (२७०.३ ट्रिलियन येन) एवढे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा आकडा जपानच्या एकूण जीडीपीच्या निम्म्याहून अधिक असून, महागाई वाढ व भूगोलविषयक बदल यामुळे आधीच्या 214.2 ट्रिलियन येनच्या अंदाजापेक्षा हा आकडा वाढवण्यात आला आहे.
advertisement
12.3 लाख लोकांना स्थलांतर करावे लागणार?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य भूकंपामुळे तब्बल 12.3 लाख लोकांना स्थलांतर करावे लागू शकते, जे जपानच्या एकूण लोकसंख्येच्या 10% आहे. जर हा भूकंप हिवाळ्यात मध्यरात्रीच्या वेळी झाला, तर सुमारे 2.98 लाख लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. मुख्यतः त्सुनामी आणि इमारतींच्या कोसळण्यामुळे ही जीवितहानी होऊ शकते.
advertisement
नानकाई ट्रोफ: भूकंपाचा सर्वात धोकादायक भाग
जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. सरकारच्या अंदाजानुसार, नानकाई ट्रोफ या क्षेत्रात येत्या काही वर्षांत 8-9 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाची 80% शक्यता आहे. हा ट्रोफ जपानच्या दक्षिण-पश्चिम पॅसिफिक किनाऱ्याजवळ असून, जवळपास 900 किलोमीटर (600 मैल) लांब आहे. येथे फिलिपाईन समुद्री प्लेट युरेशियन प्लेटखाली सरकत आहे. त्यामुळे येथे दर 100 ते 150 वर्षांनी भूकंप होण्याची शक्यता असते.
advertisement
2011 च्या महाभूकंपाची आठवण
2011 मध्ये जपानमध्ये 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली होती आणि देशाच्या उत्तर-पूर्व भागातील फुकुशिमा अणुवीज केंद्रात तीन अणुभट्यांचे वितळन झाले होते. या भयंकर आपत्तीत 15,000 हून अधिक लोकांनी प्राण गमावले होते.
advertisement
जपान सरकार सध्या महाभूकंपाच्या संभाव्य धोका ओळखून बचावयोजना तयार करत आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 31, 2025 10:49 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पृथ्वीवर महाभयंकर संकट, नानकाई ट्रफमध्ये 'टेक्टोनिक टाईम बॉम्ब'चा धोका; एका क्षणात 2.98 लाख मृत्युमुखी पडण्याची भीती


