पप्पापण दाखवायला हवा होता! चिमुकलीचा VIDEO पाहून लोकांना वडिलांना पाहण्याची उत्सुकता, असं काय आहे यात

Last Updated:

Girl Video Viral : चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून लोकांचं मन भरत नाही आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत. काहींनी तर तिच्या वडिलांना पाहण्याची उत्सुकता दाखवली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : लहान मुलं कधी काय बोलतील याचा नेम नाही. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. चिमुकली आपल्या पप्पांबाबत सांगत, पप्पांची तक्रार करत आहे आणि त्यांना सल्लाही देत आहे. चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून लोकांचं मन भरत नाही आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत.
एक लहान मुलगी जी खाते आहे आणि तिच्यासमोर तिची आई बसली आहे. चिमुकली काहीतरी बोलते आहे आणि तिच्या आईने तिचा व्हिडीओ बनवला आहे. चिमुकलीची पप्पांबाबतची तक्रार आहे आणि त्यांना तिने मोलाचा सल्लाही दिला आहे.
व्हिडीओत चिमुकली आईला सांगते, पप्पा तिथे झोपतात आणि मी इथं. पप्पा माझ्या बाजूला झोपतात. मग त्यांना खोकला आला ना की माझं तोंड जिथं असेल तिथं ते तोंड करतात. त्यांनी ध्यानात ठेवायला हवं ना, मोठे आहेत ना ते. पोरगी आहे तिथं. मला एनर्जी नाही का होणार... चिमुकलीला इथं अॅलर्जी म्हणायचं आहे, ती एनर्जी असं म्हणते तिची आई तिला योग्य शब्द संगते. पण तिचं अॅलर्जीचं एनर्जी म्हणणं अनेकांना आवडलं आहे.
advertisement
चिमुकलीला सर्दी-खोकला झाल्याचंही दिसतं आहे आणि यासाठी कारणीभूत ती तिच्या वडिलांना ठरवत आहे. सगळं सगळं पप्पांमुळे झालं असं ती म्हणते.



 










View this post on Instagram























 

A post shared by Pooja Kamble (@navya_kamble_2019)



advertisement
तिची बोलण्याची स्टाईल, चेहऱ्यावरील हावभाव अनेकांना आवडले आहेत. कित्येक जण या चिमुकलीच्या प्रेमात पडले आहेत. किती गोड मुलगी आहे, आपल्यालाही अशी मुलगी आहे, प्रत्येक घरात अशी मुलगी असावी, अशा कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. काही जणांनी हा व्हिडीओ आपण खूप वेळा पाहिला पण मन भरत नाही आहे, हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावा असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एका युझरने तर चिमुकलीचं पप्पांबाबत इतकं बोलणं ऐकल्यानंतर तिच्या पप्पांनापण दाखवायला हवं होतं असं म्हटलं आहे.
advertisement
@navya_kamble_2019 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काहीही म्हणा पण चिमुकलीचा हा पप्पांसाठी असलेला सल्ला प्रत्येकाने लक्षात ठेवावा असा आहे. तुम्हाला चिमुकलीचं म्हणणं पटतंय ना? तिचा हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या/Viral/
पप्पापण दाखवायला हवा होता! चिमुकलीचा VIDEO पाहून लोकांना वडिलांना पाहण्याची उत्सुकता, असं काय आहे यात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement