अहो, कमालच झाली! 25 वर्षे जुनी बाईक शोरूममध्ये नेली, कंपनीने 13 लाखांची गाडी फ्री दिली, कसं काय?

Last Updated:

Hero Bike : अलीकडेच कंपनीने हिरो स्प्लेंडरच्या मालकाला 13 लाख किमतीची एक नवीन बाईक सेंटेनिअल एडिशन जी  हिरोची एक स्पेशल एडिशन बाईक आहे जी खूपच दुर्मिळ आहे, ती भेट दिली आहे. पण का? चला जाणून घेऊया.

News18
News18
नवी दिल्ली : कोणतीही जुनी वस्तू असो मग ती गाडी का असेना ती विकली तरी त्याची पूर्ण किंमत आपल्याला मिळत नाही किंवा त्याबदल्यात त्याच्या किमतीइतकीही दुसरी गाडी मिळणार नाही. असं असताना एका व्यक्तीला मात्र त्याच्या जुन्या बाईकच्या बदल्यात लाखो रुपयांची नवीकोरी बाईक मिळाली आहे. तीसुद्धा तब्बल 13 लाखांची. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आता हे कसं काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
स्प्लेंडरच्या शोरूममध्ये बापलेकाची जोडी पोहोचली. त्यांनी 25 वर्षे जुन्या हिरो स्प्लेंडरने मंगळूरहून लडाखला प्रवास केला. त्यानंतर ते 25 वर्षांच्या स्प्लेंडरसह हिरो शोरूममध्ये पोहोचली, जिथं सेंटेनिअल एडिशन बाईक त्यांची वाट पाहत होती.
काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये?
सेंटेनिअल एडिशन ही हिरोची एक स्पेशल एडिशन बाईक आहे जी खूपच दुर्मिळ आहे. ही स्पेशल एडिशन बाईक हीरो मोटोकॉर्पचे संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या 101 व्या वर्धापन दिनानिमित्त बनवण्यात आली आहे. ही बाईक करिझ्मा एक्सएमआरवर आधारित आहे. यात कार्बन फायबर बॉडी पॅनल्स, अक्रापोविक एक्झॉस्ट, अॅल्युमिनियम स्विंग आर्म, 43 मिमी यूएसडी अॅडजस्टेबल फोर्क्स, विल्बर्स पूर्णपणे अॅडजस्टेबल गॅस-चार्ज्ड मोनोशॉक आणि बरेच काही आहे. बाइकमध्ये 210 सीसी इंजिन समान आहे परंतु त्यात अधिक पॉवर आणि टॉर्क असू शकतो.
advertisement
याच्या भारतात फक्त 100 युनिट्स उपलब्ध आहेत. हिरोने या बाईकचे 100 युनिट्स बनवले. हिरोच्या अंतर्गत टीमने या बाईकचे सुमारे 25 युनिट्स मिळवले. उर्वरित 75 युनिट्सचा लिलाव करून हिरोने 8.6 कोटी रुपये कमावले. प्रत्येक युनिटची किंमत 13 लाख रुपये आहे.
advertisement
दुर्मिळ गाडी फ्रीमध्ये का दिली?
अशी ही जुनी गाडी जुनी हिरो स्पलेंडर गाडी शोरूममध्ये आणणाऱ्या बापलेकाच्या जोडीला का देण्यात आली असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.
हिरो स्प्लेंडर ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी मोटारसायकल आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ती पहिल्या क्रमांकावर आहे. स्प्लेंडर ही एक अतिशय स्वस्त, अत्यंत विश्वासार्ह आणि उत्कृष्ट मायलेज देणारी बाईक आहे. ही बाईक कोणत्याही भूप्रदेशात आणि हवामानात उत्कृष्ट कामगिरी देण्यास सक्षम आहे. तिची देखभाल देखील खूप कमी आहे.
advertisement
स्प्लेंडर ही एक छोटी कम्युटर बाईक आहे अशी बाईक घेऊन लडाखला प्रवास करणं म्हणजे खूपच चांगली कामगिरी. हिरो कंपनी या प्रवासाने खूप प्रभावित झाली, त्यामुळे त्यांनी या बापलेकाला एक सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. हिरो मोटोकॉर्पने त्यांना सेंटेनिअल एडिशन बाईक भेट देण्याचा निर्णय घेतला, ज्याची किंमत 13 लाख रुपये आहे. कंपनीने त्यांना 13 लाखांची बाईक मोफत दिली. कराण त्यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या स्प्लेंडरने एक अद्भुत कामगिरी केली.
मराठी बातम्या/Viral/
अहो, कमालच झाली! 25 वर्षे जुनी बाईक शोरूममध्ये नेली, कंपनीने 13 लाखांची गाडी फ्री दिली, कसं काय?
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement