वयाच्या 16व्या वर्षीच प्रेग्नंट, 6 वेगवेगळ्या पुरुषांपासून 6 मुलं, आता 44 व्या वयात महिलेसोबत नको तेच घडतंय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman 6 Child from 6 Different Men : तिने वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्या मुलाला जन्म दिलं, जेव्हा तिचं कौटुंबिक आयुष्य अस्थिर होतं. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, मला एक मूल हवं होत कारण मला अशी व्यक्ती हवी होती ज्यावर मी प्रेम करू शकेन.
वॉशिंग्टन : दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं झाल्याची प्रकरणं काही कमी नाही. पण एक अशी महिला जिने 6 मुलांना जन्म दिला. पण तिची ही सहा मुलं सहा वेगवेगळ्या पुरुषांपासून झालेली आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षीच ही महिला प्रेग्नंट झाली. आता ही महिला 44 वर्षांची आहे. पण स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आहे.
अमेरिकेत राहणारी ही महिला, टॅनेटा हॅम्प्टन असं तिचं नाव आहे. ती 44 वर्षांची आहे. तिला एकूण 6 मुलं आहेत. तिने वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्या मुलाला जन्म दिलं, जेव्हा तिचं कौटुंबिक आयुष्य अस्थिर होतं. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, "मला एक मूल हवं होत कारण मला अशी व्यक्ती हवी होती ज्यावर मी प्रेम करू शकेन."
advertisement
इतक्या लहान वयात, टॅनेटा ही चार नातवंडांची आजी आहे. टॅनेटाने वयाच्या 16 व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, जेव्हा तिचे कौटुंबिक जीवन अस्थिर होते. अशाप्रकारे वयाच्या 26 वर्षापर्यंत टॅनेटा पाच मुलांची आई बनली. निया (27 वर्षे), डायलिक (25 वर्षे), डार्मनिक (24 वर्षे), झेन (20 वर्षे) आणि काहलाई (17 वर्षे) अशी त्यांची नावं.
advertisement
या सर्व मुलांचे वडील वेगळे. सिंगल मदर म्हणून हा काळ तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. तिने याला 'सर्वाइवल मोड' असं म्हटलं. जिथं तिला तिच्या मुलांसाठी प्रत्येक अडचणीशी झुंजावं लागलं.
त्यानंतर 11 वर्षांपूर्वी टॅनेटा फ्रेडरिक नावाच्या व्यक्तीला भेटली, ज्याचं तिच्या मुलांशी खूप चांगलं जमायचं. दोघांनीही लगेच लग्न केलं. लग्नाच्या 10 वर्षांनंतर, वयाच्या 43 व्या वर्षी तिच्या आयुष्यात एक वळण आलं. ते म्हणजे तिचं सहावं मूल नाओमी (7 महिने), जी तिच्या मोठ्या बहिणीपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे.
advertisement
सहाव्या मुलाबद्दल ऐकून मुलांना धक्का
तनेटा म्हणाली, जेव्हा मी सहाव्या मुलाची प्लॅनिंग करत होते तेव्हा इतर मुलांना माझ्या गरोदरपणाबद्दल धक्का बसला. तिची मोठी मुलगी नियाने गरोदरपणाच्या धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे तनेटाने आयव्हीएफ मार्ग स्वीकारला. मुलगा डार्मनिकला वाटलं की त्याची आई वेडेपणा करत आहे, तर मुलगी झेन म्हणाली की ती "यासाठी खूप मोठी आहे." धाकटी मुलगी कहलाई या बातमीने नाराज झाली.
advertisement
पण स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आहे. तनेटाचा मुलगा डिलिकही तिसऱ्यांदा वडील होणार होता. अशाप्रकारे त्याचं मूल आणि त्याची धाकटी बहीण नाओमी फक्त तीन महिन्यांच्या फरकाने जन्माला आले. डिलिकला अजूनही ते विचित्र वाटतं. पण नाओमीच्या जन्माने कुटुंब एकत्र आणलं.
तनेटा सोशल मीडियावर खूप ट्रोल
27 वर्षांच्या वयाच्या फरका असूनही तनेटाची मुलं आता या अनोख्या कुटुंबाला स्वीकारत आहेत. पण तनेटाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातं. काही लोक सहा वेगवेगळ्या वडिलांसह असलेल्या तिच्या मुलांना "लज्जास्पद" म्हणतात, तर काहींनी 43 व्या वर्षी गर्भवती राहिल्याबद्दल तिला स्वार्थी म्हटले. काही युझर्सनी ती मुलांशी स्पर्धा करत असल्याचंही म्हटलं.
advertisement
तनेटाने ट्रोलर्सलाही उत्तर दिलं आहे. "ही काही कामगिरी नाही, परंतु मी या सर्व अडचणींवर मात केली आहे. माझ्या प्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्व वेगळे आहे आणि माझ्या आयुष्यात त्यांचा एक विशेष अर्थ आहे. काही लोकांना हे समजत नाही. मलाही ते काही फरक पडत नाही.", असं तीम्हणालीय
advertisement
अलीकडेच, तनेटाचे जीवन माय एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅमिली या YouTube शोमध्ये दाखवण्यात आलं. ते पाहिल्यानंतर अनेक युझर्सनी तनेटाचे कौतुक केलं. एका युझरनं लिहिलं, "43 व्या वर्षी मूल होणं, तू अद्भुत आहेस!" दुसऱ्याने म्हटले, "ही कहाणी धक्कादायक किंवा त्रासदायक नाही. ही एका आईची कहाणी आहे जी तिच्या मुलावर प्रेम करते आणि त्यांचं रक्षण करते." तनेटाने स्पष्ट केलं की त्यांना आता आणखी मुलं नको आहेत, परंतु खूप नातवंडं हवी आहेत.
Location :
Delhi
First Published :
July 10, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/Viral/
वयाच्या 16व्या वर्षीच प्रेग्नंट, 6 वेगवेगळ्या पुरुषांपासून 6 मुलं, आता 44 व्या वयात महिलेसोबत नको तेच घडतंय