ऐन दिवाळीत कांदा शेतकऱ्यांना रडवणार! परदेशातून आली घक्कादायक अपडेट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agricuture News : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात जुना रब्बी कांद्याचा साठा आहे. त्यात कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी सुरू झाली असून, लवकरच राजस्थान आणि गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा वाढेल. या सर्व घटकांमुळे बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाव आणखी कोसळू शकतात, असा इशारा कांदा निर्यातदारांनी दिला आहे.
खरीप कांदा उशिरा बाजारात
यावर्षी उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून ती नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहील. या काळात जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात येणार असल्याने, पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा कांद्याची कोणतीही टंचाई भासणार नाही.
advertisement
परदेशी बाजारातील मागणी घटली
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे.
सध्या देशातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याला केवळ २०० ते ९७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या दरात आणखी घसरण झाल्यास कांदा उत्पादकांच्या अडचणींमध्ये भर पडणार आहे. कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले की, “परदेशातून मागणी घटल्याने निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात साठा वाढत असून भाव कोसळण्याची शक्यता आहे.”
advertisement
कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर बंदीची मागणी
विकास सिंग यांनी पुढे सांगितले की, भारतीय कांदा बियाण्यांची निर्यातही दीर्घकालीन संकट निर्माण करत आहे. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि इतर शेजारी देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून स्वतःचे उत्पादन वाढवत आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे. यामुळे भविष्यात भारताचा कांदा निर्यात बाजार धोक्यात येऊ शकतो.त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणी कांदा निर्यातदार संघटनेने केली आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती
view commentsकांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. दुसरीकडे बाजारात साठा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी दडपण येत आहे. शेतकऱ्यांनी सध्या जुना साठा सुरक्षित ठेवण्यासाठी हवेशीर कोठारे वापरणे, तसेच विक्रीसाठी बाजारभावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 8:45 AM IST