Property Registration : धावपळीची कटकट वाचणार, मुंबईकरांना दिवाळी भेट, चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची घोषणा

Last Updated:

Property Registration : दिवाळीपूर्वी मुंबईकरांसाठी महसूल विभागाकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

धावपळीची कटकट वाचणार, मुंबईकरांना दिवाळी भेट,  चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची घोषणा
धावपळीची कटकट वाचणार, मुंबईकरांना दिवाळी भेट, चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची घोषणा
मुंबई: दिवाळीपूर्वी मुंबईकरांसाठी महसूल विभागाकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक तसेच कंपनी मालक आपल्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी (Adjudication of Document) करू शकतील. यामुळे मुंबईकरांच्या धावपळीची कटकट संपणार आहे.
advertisement
यापूर्वी ज्या भागात रहिवासी अथवा व्यावसायिक प्रतिष्ठान होते, तेथीलच मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करण्याची सक्ती होती. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ही अट आता रद्द करण्यात आली आहे.
या नव्या बदलानुसार, बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर, तसेच ओल्ड कस्टम हाऊसजवळील प्रधान मुद्रांक कार्यालय (अंमलबजावणी एक आणि दोन) या सहा कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी मालमत्ता करार, भाडेकरार, वारसा हक्कपत्र, व अन्य महत्वाची दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
advertisement
महसूल विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ, धावपळ आणि प्रशासकीय त्रास कमी होणार आहे. दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. विशेष म्हणजे, यासंदर्भातील शासन निर्णय आणि राजपत्र अधिसूचना महसूल विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
या निर्णयाला नागरिक आणि मालमत्ता व्यवहार क्षेत्रातील व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मुंबईकरांसाठी ही दिवाळी भेट ठरली असून यामुळे नोंदणीच्या कामासाठी यापुढे अधिक वेळ लागणार नसल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Property Registration : धावपळीची कटकट वाचणार, मुंबईकरांना दिवाळी भेट, चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची घोषणा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement