IND vs WI 2nd Test : दिल्ली टेस्ट जिंकल्यावरच गंभीर कापणार केक, टीम इंडिया हॉटेलवर जाऊन करणार लंच!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India Win Delhi Test Against West Indies : टीम इंडियाला विजयासाठी 58 धावांची गरज असल्याने साई सुदर्शन आणि केएल राहुल पहिल्या तासाभरात खेळ खल्लास करतील आणि मालिका खिशात घालतील, अशी शक्यता आहे.
Team India win IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामना दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्यातील अखेरच्या दिवशी टीम इंडियाचा विजय निश्चित होईल. टीम इंडियाला विजयासाठी फक्त 58 धावांची गरज असून हातात आणखी 9 विकेट्स आहेत. अशातच आता टीम इंडियाचा लंचचा प्लॅन ड्रेसिंग रुममध्ये नाही तर हॉटेलवर आयोजित केला जाईल. तर गंभीर देखील आपल्या वाढदिवसाचा केक विजयानंतरच कापणार आहे.
पहिल्या तासाभरात खेळ खल्लास
टीम इंडियाला विजयासाठी 58 धावांची गरज असल्याने साई सुदर्शन आणि केएल राहुल पहिल्या तासाभरात खेळ खल्लास करतील आणि मालिका खिशात घालतील, अशी शक्यता आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराजला 2 विकेट घेण्यात यश आलं. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही 1-1 विकेट मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा 390 रनवर ऑलआऊट झाल्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 121 रनचं आव्हान मिळालं होतं. अशातच आता टीम इंडिया लंचआधीच खेळ संपवणार आहे.
advertisement
वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला, पण...
टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 518 धावांवर डाव घोषित केला, यानंतर वेस्ट इंडिजचा पहिल्या इनिंगमध्ये 248 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारतीय टीमने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला, पण त्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी झुंजार शतकी खेळी केल्या कॅम्पबेलने 115 तर होपने 103 रन केले, याशिवाय जस्टीन ग्रीव्हसने नाबाद 50 रनची खेळी केली. शेवटच्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जेडेन सिल्सनेही 32 रन केले होते.
advertisement
सीरिज 2-0 ने जिंकल्याचा फायदा
दरम्यान, दिल्ली कसोटीमध्ये विजय मिळाला तर टीम इंडिया ही सीरिज 2-0 ने जिंकेल. याआधी अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यातही टीम इंडियाचा विजय झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्धची ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे, त्यामुळे ही सीरिज 2-0 ने जिंकल्याचा फायदा टीम इंडियाला होईल. पॉईंट्स टेबलमध्ये या सीरिजआधी टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर होती.
advertisement
वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन : जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कॅप्टन), टेविन इम्लाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 14, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 2nd Test : दिल्ली टेस्ट जिंकल्यावरच गंभीर कापणार केक, टीम इंडिया हॉटेलवर जाऊन करणार लंच!